Sunday, August 3, 2025
Homeपुणेलोणावळास्वच्छ सर्वेक्षणमध्ये लोणावळा नगरपरिषदेला दिल्ली येथे अव्वल क्रमांकाचे मानांकन...

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये लोणावळा नगरपरिषदेला दिल्ली येथे अव्वल क्रमांकाचे मानांकन…

लोणावळा(प्रतिनिधी) : लोणावळा नगरिषदेने सलग पाचव्यांदा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात लोणावळा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी अव्वल राहून देश पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे . यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात 50 हजार ते 1 लाख लोकसंख्या या गटात लोणावळा शहर सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले.
नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर हा सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न झाला . लोणावळा नगरपरिषद मार्फत मुख्याधिकारी पंडित पाटील , माजी नगराध्यक्ष श्रीमती सुरेखा जाधव , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , शहर समन्वयक अक्षय पाटील , नगर अभियंता वैशाली मठपती , नगर परिषद अभियंता यशवंत मुंडे , खरेदी पर्यवेक्षक दत्तात्रय सुतार , सहाय्यक ग्रंथपाल विजय लोणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
लोणावळा नगरपरिषद ही स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कायमच अग्रेसर राहिली आहे . यात सर्व नगरपरिषद अधिकारी कर्मचारी , सर्व पदाधिकारी , माजी नगरसेवक , सर्व पत्रकार संघ , सामाजिक संस्था , शाळा व नागरिक यांच्यामुळेच हे यश असे अबाधित राहिले असल्याचे मत मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी व्यक्त केले. तसेच यापुढेही स्वच्छ सर्वेक्षणात सातत्यपूर्ण कामगिरी राखण्याचा तसेच लोणावळा शहराला स्वच्छ , सुंदर व हरित ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page