प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खोपोली,परळी, जांभुळपाडा, लोहाणा महाजन समाजबांधवांच्या वतीने खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज NB सेंटरसाठी खोपोली शहरातील लोहाणा समाज हॉल मध्ये रक्तदान शिबीरियाचे आयोजन केले गेले. दरवर्षी राष्ट्रीय सणाचे औचित्य साधत रक्तदानाचे शिबीर आयोजित करून आपले देशप्रेम प्रकट करण्याचा संकल्प पूर्ण करण्याची परंपरा यंदाच्या स्वातंत्र्य दिनीही जपली गेली.
कोरोना आणि साथीच्या रोगामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे अनेक संस्थांच्या सहभागातून खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटरमध्ये उपलब्ध होणारे रक्त हे स्थानिक स्तरांवर अत्यंत मोलाची भूमिका पार पडत असते. खास करून खोपोलीतील रुग्णांना अशा शिबिरांचा फायदा होतो. या शिबिरात विविध क्षेत्रातल्या मान्यवर आणि रक्तदात्यानी तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले.
लोहाणा महाजन समाजाचे शैलेश विठ्लानी, प्रवीण शहा, पंकज विठ्लानी, राजेश आभाणी, मनीष ठक्कर, मनीष विठ्लानी, जयेश आभाणी, दर्श आभाणी,यांनी या शिबिराच्या संपन्नतेसाठी विशेष प्रयत्न केले. खोपोली नगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक किशोर पानसरे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, गोरक्षक हनीफ कर्जीकर यांनी देखील उपस्थिती दर्शवली.