तळेगाव प्रतिनिधी : हर घर तिरंगा मोहीम भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांना त्यांचा राष्ट्रध्वज घरी घेऊन जाऊन 75 व्या स्वातंत्र्य वर्षाच्या स्मरणार्थ प्रदर्शित करण्यासाठी प्रारंभ करण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे.
भारत सरकारच्या सूचनेनुसार , या मोहिमेचे उद्दिष्ट ध्वजाशी वैयक्तिक बंध निर्माण करणे आणि देशात एकत्रीत येणे असे आहे . हर घर तिरंगा अभियान देशभक्तीची भावना वाढवेल आणि ध्वजाबद्दल जनजागृती करेल असा विश्वास जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी व्यक्त केला आहे , तसेच हर घर तिरंगा मोहिमेत प्रत्येक भारतीयाने सामील व्हावे असे आवाहन आवारे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून हर घर तिरंगा या मोहिमेला क्रांती दिनाचे औचित्य साधून सुरुवात करण्यात आली , यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाळासाहेब जांभुळकर तसेच ज्येष्ठ नेते सुरेशभाई शहा , कलापिनीचे विश्वस्त डॉ अनंत परांजपे , तसेच तळेगाव शहरातील ज्येष्ठ निवेदिका सौ विनयाताई केसकर यांना सन्मानपूर्वक तिरंगा प्रदान करून हर घर तिरंगा या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
एकूणच पाच हजार तिरंगा वितरणाचे जनसेवा विकास समितीचे उद्दिष्ट असून हर घर ‘ तिरंगा ‘ मोहिमेचा मुख्य हेतू प्रत्येक भारतीयाला त्यांच्या घरी तिरंगा फडकविण्यासाठी अधिकाधिक प्रोत्साहित करणे, राष्ट्रध्वजाशी देशवासीयांचे वैयक्तिक नाते प्रस्थापित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
त्यामुळेच हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली असून जिथे भारतीयांना 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवण्याची संधी दिली जाईल असे आवारे यांनी नमूद केले . राष्ट्रध्वजाची भारतातील नागरिकांचे नाते दृढ व्हावे यासाठी जनसेवा विकास समितीने सुरू केलेला प्रकल्प अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन डॉ . आनंत परांजपे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, नगरसेवक सुनील कारंडे , समीर खांडगे , प्रवक्ते मिलिंद अच्युत , समीर दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.