गुंडगे श्री सोमजाई क्रिकेट क्लब व मित्र परीवारातर्फे महाड येथील पूरग्रस्तांना मदतीने दिलासा..
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
संततधार पावसाने अतिवृष्टीचा फटका रायगडमध्ये महाड तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाला.पुराचे पाणी संपूर्ण घरात गेल्याने संपूर्ण सामान खराब झाले.घरात चिखलच – चिखल झाले.अन्न – धान्यांची देखील नासाडी झाली.या पूरग्रस्त नागरिकांचे अश्रू पुसण्यासाठी हजारो हात मदतीसाठी गेले.
कर्जत तालुक्यातील कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातून श्री सोमजाई क्रिकेट क्लब व मित्र परिवारातर्फे ,आपण हि या समाजाचे देणे आहोत,ही सामाजिक बांधिलकी जपत, मदत नाही तर आपले कर्तव्य म्हणून महाड येथील पूरग्रस्त नागरिकांना पाणी,अन्न – धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून तेथील नागरिकांना दिलासा दिला.दि.२१ जुलै ची रात्र सर्वांसाठीच भयानक रात्र ठरली.
नदीची पातळी ओलांडल्याने सर्वत्र महापूर आला.थोडीही उसंत न मिळता घरात पाणी शिरल्याने विजे अभावी नागरिक घाबरले आपला व आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचविण्यात आला.मात्र घरातील काडी – काडी जमवून केलेला एव्हढ्या वर्षांचा संसार आपल्या डोळ्यादेखत खराब होत असताना सर्वांनाच दुःख होत होते.
महाड तालुक्यातील गोठे आणि पंचशील नगर येथील नागरिकांच्या देखील घरातबपाणी शिरून अतोनात नुकसान झाले होते.सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असताना दोन वेळेचे जेवण देखील बनविण्यास शिल्लक काहीच राहिले नसताना कर्जत तालुक्यातील गुंडगे गावातील श्री सोमजाई क्रिकेट क्लब व मित्र परिवाराने त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून दिलासा दिला.
आपल्या सोबत त्यांनी टेम्पोत पाणी बिस्लरी बॉटल,अन्न – धान्य ,व इतर रोजच्या लागणाऱ्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वच्छता करण्याचे सामान,सुरक्षिततेची साधने असे सर्व सामान येथील नागरिकांना दि. ३० जुलै २०२१ रोजी या टिमने दिले.
मा.रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी व कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मदतीच्या केलेल्या आवाहनाला श्री सोमजाई क्रिकेट क्लब व मित्र परिवारातर्फे हाक देऊन या टीमने सामाजिक बांधिलकी जपत,आपले कोकण,आपली माणस म्हणून हि मदत नव्हे तर कर्तव्य समजून श्री सोमजाई क्रिकेट क्लब व मित्र परिवाराने मदतीचा उचललेला खारीचा वाटा , खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.