Friday, June 27, 2025
Homeपुणेलोणावळाहिंदी सक्तीला विरोध; मनसेकडून लोणावळ्यातील शाळांना राज ठाकरे यांचे पत्र वितरित..

हिंदी सक्तीला विरोध; मनसेकडून लोणावळ्यातील शाळांना राज ठाकरे यांचे पत्र वितरित..

प्रतिनिधी : श्रावणी कामत.

लोणावळा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या वाढत्या प्रवृत्तीविरोधात तीव्र शब्दांत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी लिहिलेलं एक परखड आणि स्पष्ट पत्र पत्रकारांसमोर वाचून दाखवलं.

या पत्राच्या अनुषंगाने, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आणि मनसेचे नेते बाबू वागसकर यांच्या मार्गदर्शनानुसार, राज ठाकरे यांचे पत्र लोणावळा शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांना सुपूर्द करण्यात आले.

लोणावळा शहर मनसे अध्यक्ष निखिल हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शाळांना भेट देत हे पत्र सादर केले. यामध्ये मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि शैक्षणिक पातळीवर तिच्या अनिवार्य वापरासाठी मनसेची भूमिका अधोरेखित करण्यात आली.

या उपक्रमावेळी मनसेचे उपाध्यक्ष दिनेश कालेकर, प्रवक्ते अमित भोसले, संघटक अभिजित फासगे, निलेश लांडगे, सुनील सोनवणे, संदीप बोभाटे, जुबेर मुल्ला, श्रेयस कांबळे, शुभम पवार, कैवल्य जोशी, सुभाष रेड्डी, श्रेयस केदारी, किशोर साठे, सौरभ कराळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राज ठाकरे यांच्या पत्राच्या माध्यमातून राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याचे आणि हिंदी सक्तीला विरोध करण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. मनसेच्या या उपक्रमामुळे मराठी अभिमान जागृत करण्यास हातभार लागणार असल्याचे मत उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page