Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रहिवरे गावचे सुपुत्र प्रा. जयसिंह ओहोळ यांना पुढिल संशोधनासाठी (तेवीस लाख)...

हिवरे गावचे सुपुत्र प्रा. जयसिंह ओहोळ यांना पुढिल संशोधनासाठी (तेवीस लाख) रुपयांची राष्ट्रीय फेलोशिप मंजूर”..

दि.07/12/2020
प्रतिनिधी, संतोष पवार

करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे सुपुत्र, लेखक, कवी, प्रा. जयसिंह ओहोळ यांना विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली ( UGC) व राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या वतीने पुढील संशोधनासाठी राष्ट्रीय फेलोशिप (NFSC) अवॉर्ड झाली आहे. UGC दिल्ली व NTA वतीने त्यांना संशोधनासाठी २३,००००० (तेवीस लाख रुपये) फेलोशिप मंजूर झाली आहे.

प्रा. जयसिंह ओहोळ यांनी आतापर्यंत ( MA., Phd App, SET, NET, NET- NFSC Pol. Science) या पदव्या प्राप्त केल्या असून सध्या ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे राज्यशास्त्र अधिविभागात संशोधन करत आहे.याबद्दल त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की अलिकडे शिक्षण घेऊन काही होत नाही नोकरी लागत नाही हा नकारात्मक विचार सोडून जर निष्ठापुर्वक प्रयत्न केले तर यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाप्रती सकारात्मक विचार शिक्षण अर्धवट न सोडता उच्च शिक्षणास प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन केले.

राष्ट्रीय स्तरावरील फेलोशिप मिळाल्याने त्यांच्या या यशाचे करमाळा तालुक्यातून अभिनंदन होत आहे. प्रा.जयसिंह ओहोळ हे वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ यांचे सुपुत्र आहेत. यां त्यांच्या यशाबद्दल साहित्यिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page