Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळाहेमंत मुळे यांची लोणावळा शहर दहीहंडी महोत्सवाच्या अध्यक्षपदी निवड…

हेमंत मुळे यांची लोणावळा शहर दहीहंडी महोत्सवाच्या अध्यक्षपदी निवड…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळा शहरातील मानाच्या पहिल्या दहीहंडी महोत्सवाच्या अध्यक्षपदी हेमंत मुळे यांची एकमताने निवड जाहिर करण्यात आली.माजी अध्यक्ष राजेंद्र चौहान यांनी आयोजित केलेल्या समितीच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. मागील अनेक वर्ष दहिहंडी उत्सव समितीचे अध्यक्षपद राजेंद्र चौहान यांच्याकडे होते.
दोन दशकांची परंपरा असलेली लोणावळा शहरातील मानाची पहिल्या दहीहंडी महोत्सवात मावळ वार्ता फौंडेशन, सर्व राजकीय पक्ष, विविध संघटना,लोणावळा शहर पत्रकार संघ सर्व एकत्रित येऊन हा भव्य दिव्य असा दहीहंडी महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौकात दरवर्षी आयोजित केला जातो.

यावर्षी देखील अतिशय उत्साहात हा महोत्सव साजरा करणार असून त्याची तयारी सुरु करताना यावर्षी नूतन अध्यक्ष हेमंत मुळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदकुमार (बाबूजी) वाळंज, बाळासाहेब फाटक, सचिन पारख, किरण गायकवाड, जितेंद्र कल्याणजी, संजय आडसुळे, रमेश पाळेकर, बापुलाल तारे, संदीप वर्तक, भरत तिखे, बाबुभाई शेख, नविन भुरट, आनंद नाईक, ज्ञानेश्वर येवले आदी जण उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page