Thursday, July 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड२० मार्च चवदार तळे " क्रांतीदिनानिमित्त " कर्जत तालुक्यातील कलावंतांची गायनातुन मानवंदना...

२० मार्च चवदार तळे ” क्रांतीदिनानिमित्त ” कर्जत तालुक्यातील कलावंतांची गायनातुन मानवंदना !

महाराष्ट्राचे ख्यातनाम ” कवी मुकुंद सोनावणे व गायक मोहन धनवटे ” यांचे नियोजन…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी केलेला पाण्याचा सत्याग्रह हा मूलभूत हक्क आणि अधिकारासाठी तसेच शोषण व विषमतावादी व्यवस्थेविरुध्द पुकारलेल्या ऐतिहासिक समतेच्या संघर्षाचा प्रारंभ होता.

” समतेचा संगर चवदार तळे सत्याग्रह ” हा लढा नुसता पाण्यासाठी नसून मानवतेच्या हक्कासाठी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन महाड येथे २० मार्च १९२७ रोजी सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे , म्हणून केलेला सत्याग्रह होता. रक्ताचा एक थेंब ही न सांडवता पाण्यासाठी केलेला हा सत्याग्रह जगप्रसिद्ध आहे . या दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा शाखा ता. कर्जत यांच्या विद्यमाने व महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी मुकुंद सोनावणे व गायक मोहन धनवटे यांच्या सहकार्याने २० मार्च चवदार तळे क्रांतीदिनानिमित्त कर्जत तालुक्यातील कलावंतांनी गीत गायनातुन मानवंदना देण्याचा कार्यक्रम बुधवार दिनांक १९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७ – ०० वाजता कर्जतमध्ये ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ” येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील बहुजन वर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून प्रतिसाद दिला.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास कर्जत न. प. चे प्रथम उपनगराध्यक्ष तथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव व भारतीय बौद्ध महासभेचे गुलाब शिंदे यांच्या तर भारतीय संविधानाचे प्रास्ताविकास मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून झाली .याप्रसंगी गायक अशोक दादा सोनावणे यांनी भीम वंदना गीत सादर केले , मिलिंद शिंदे – क्रांती बुद्धाची दिसली जी भीमाच्या पेनामध्ये….छाया भालेराव – पोटाला नव्हत पोटभर पाणी , मागे कधीही हटला नाही , भीम माझ्या समाजासाठी ….वामन शिंदे – विषमतेचा आहे या देशाला धोका….शेखर शिंदे – एका वकिलाच्या लेखणीने , त्यांच्या कायद्याच्या आखणीने , आमच्या हक्काच कुणी नाही केलं जी माय , माझ्या भीमान केलं…..गायकवाड – कुंभारा परी भीमाने घडविले , मोहन धनवटे – भीमाने केला सत्याग्रह त्या चवदार तळ्यावरी…..आता पाणी नळाला येतोय घरी…..पाणी नळाला येतोय घरी……..असे विविध कलाकारांनी गीत गायनातून महाडचा मुक्तिसंग्राम सत्याग्रह कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली . वादक भगवान भागा यादव व महेंद्र गायकवाड यांनी त्यांना साथ दिली.

यावेळी या कार्यक्रमास एस आर पी जिल्हाध्यक्ष उत्तम भाई जाधव , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धर्मेंद्र दादा मोरे , वंचितचे कर्जत ता. अध्यक्ष प्रदीप ढोले , आर पी आय कर्जत तालुका प्रभारी अध्यक्ष मनोज भाई गायकवाड , राजू जगताप , स्वराज्य संविधान रक्षक पँथर आर्मी प्रदेश अध्यक्ष सुशील भाई जाधव , पँथर आशिष भाई खंडागळे , भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड , दिपक भालेराव , बी .जी. गायकवाड , के. के. गाडे , जाधव , चव्हाण , सौ. ज्योती गायकवाड , अमृता अभंगे , दौलत ब्राम्हणे, जाधव पोलीस , गणपत गायकवाड , आप्पा साळवे , गणेश कांबळे , मामा भालेराव , ओव्हाळ , पत्रकार प्रशांत खराडे , दिलीप गायकवाड , सुभाष पवार , आझाद समाज पार्टीचे सचिन भालेराव , अनिल गवळे , ढोले , पंडित पोलीस , त्याचप्रमाणे बहुजन वर्ग , महिला भगिनी व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस दल यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . वरील सर्वांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले . यावेळी इतिहास तज्ञ प्राध्यापक मा. म. देशमुख यांना २ मिनिटे उभे राहून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिंदे सर यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page