Saturday, July 27, 2024
Homeपुणेलोणावळाअकरा हनुमान क्रिकेट क्लब व ठोंबरेवाडी ग्रामस्थ आयोजित TTPL क्रिकेट स्पर्धेत हुप्पा...

अकरा हनुमान क्रिकेट क्लब व ठोंबरेवाडी ग्रामस्थ आयोजित TTPL क्रिकेट स्पर्धेत हुप्पा हुय्या संघ प्रथम विजेता…

लोणावळा (प्रतिनिधी) :TTPL संस्थापक कै.अनंता (बाबा) मेणे यांच्या स्मरणार्थ अकरा हनुमान क्रिकेट क्लब व ठोंबरेवाडी ग्रामस्थ आयोजित “ठोंबरेवाडी प्रीमियर लीग” ही एकदिवसीय भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा रविवार दि.18 रोजी टाटा ह्यालीपॅड येथे संपन्न झाली.
समस्त ठोंबरेवाडी ग्रामस्थ व अकरा हनुमान क्रिकेट क्लब कडून सलग सहा वर्ष ही गावमर्यादित टेनिस क्रिकेट स्पर्धा भरविली जात आहे. या स्पर्धेत गावातील खेळाडूंना घेऊन उद्योजक व इतर प्रतिष्ठित व्यक्ती आपले संघ तयार करून ही स्पर्धा अगदी उत्साहात पार पाडतात. यावेळी या स्पर्धेसाठी उद्योजक लक्ष्मण दाभाडे व अजय ढम यांचा (मारुतीराया चॅम्पियन) संघ, युवासेना सरचिटणीस पुणे जि. शाम सुतार व युवा उद्योजक रोहिदास खरपासे यांचा (जय बजरंगबली फाईटर्स )संघ आणि युवा उद्योजक राजकुमार केंद्रे यांचा (मारुती चॅलेंजर ) हा संघ तसेच युवा कार्यकर्ते आकाश लालगुडे यांनी (हुप्पा हुय्या ) या संघांची बांधणी केली होती.
या चार संघांमध्ये सदर सहा षटकांची स्पर्धा खेळविण्यात आली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी हुप्पा हुय्या वोरिअर्स विरुद्ध मारुती राया चॅम्पियन अशी लढत झाली. या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करत हुप्पा हुय्या संघाने 6 षटकात तब्बल 79 धावांचे आवाहन मारुती राया संघासमोर ठेवले असता मारुती राया संघाने फक्त 56 धावा जमा करत 22 धावांनी उपविजेते पद स्वीकारले तर हुप्पा हुय्या संघ हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, तृतीय क्रमांक जय बजरंगबली फाईटर तर चतुर्थ क्रमांक अकरा मारुती संघ विजेता ठरला. या स्पर्धेचा मालिका विर म्हणून सुनील साठे याने पारितोषिक मिळविले तर सामना विर हे पारितोषिक सुजल सुतार यानी मिळविले तसेच उत्तम गोलंदाज सुनील साठे, उत्तम फलंदाज पंकज देशमुख, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण यासाठी श्रेयश साठे याने बाजी मारली.
अकरा हनुमान क्रिकेट क्लब व ठोंबरेवाडी ग्रामस्थ आयोजित ठोंबरेवाडी प्रीमिअर लीग ही स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मोठया उत्साहात संपन्न झाली तसेच यावेळी क्रिकेट प्रेमी व प्रेक्षकांनी या स्पर्धेचा मोठया प्रमाणात आनंद घेतला.या स्पर्धेसाठी खेळाडूं प्रमाणेच उत्तम निर्णय देण्याचे कार्य पंच राधेश्याम आणि पंच फ्रांसिस डिसोझा यांनी योग्य व उत्कृष्ठ निर्णय देत ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.
या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी युवा नेते धनंजय काळोखे, सुनील भिकूले, सुधीर पारिठे, सत्यवान दाभाडे, मारुती राक्षे, मन्या दादा, संदीप साठे, अमोल साळुंखे, कल्पेश ठोंबरे, पंकज भिलारे, जयवंत मेणे, प्रतीक गरुड, गणेश मोहळ, संदीप वाघमारे, मोहन सुतार, लक्ष्मण कातूर्डे, आकाश यादव, राजू सपकाळ, संदीप परटे, गोरक्ष मेणे, समर्थ स्पोर्ट आदींचे विशेष सहकार्य लाभले तर सर्व खेळाडूंनी ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी उत्तम खेळी करून प्रेक्षकांची मने जिंकली.
- Advertisment -

You cannot copy content of this page