अटकेपार जाणाऱ्या कर्जतच्या मिरचीला सोन्याची झळाळी ! 

0
626

मिरचीने गाठला उच्चांक तरी खवय्यांची खरेदीसाठी उडाली झुंबड…

भिसेगाव-कर्जत (सुभाष सोनावणे )दोन वर्षीचा इतिहास बघता गेल्या २३ मार्च २०२० रोजी लॉकडाऊनला सुरुवात झाली होती , त्यामुळे कर्जतची प्रसिद्ध मिरची बाजारातून या दोन वर्षांत अनेकांना मिरची खरेदी करता आली नव्हती , तरीही अनेकांनी कष्ट करून , अनेक परिश्रम करून , खोटे बोलून कर्जतमध्ये लॉकडाऊनमध्ये इन्ट्री करून मिरची खरेदी केलेली होती .मात्र अनेकांना कर्जतच्या प्रसिद्ध मिरची मसाल्याला मुकावे लागले होते , व वर्षभर जिभेचे चोचले पुरवताना ना – ना अडथळे आले होते , म्हणूनच यावर्षी खुल्या झालेल्या बाजारपेठेत मच्छी – मटण – शाकाहारी भाजी करताना स्वादिष्ट जेवण लागावे म्हणून खवय्या कुटुंबांनी फेब्रुवारी महिन्यांपासून कर्जतची मिरची खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

कर्जतच्या मिरची बाजारातून मिरची खरेदी करायला कुटुंब प्रमुख महिलांना बरोबर घेऊन येत असतात . यांत वेगवेगळ्या प्रकारची मिरची खरेदी करतात . वर्षभर मसाला पुरेल इतकी मिरची खरेदी केली जाते . ही मिरची खरेदी करण्यासाठी पनवेल , कल्याण , दिवा , ठाणे , मुंबई , नवी मुंबई , वाशी , पुणे , खोपोली , खालापूर , पेण , खंडाळा , लोणावळा , मुरबाड , त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यातील आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिक येऊन सणा सुदीस स्वादिष्ट जेवण तर कुणाच्या घरात लगीनघाई असल्याने हि मिरची मसाला खरेदीसाठी येतात. यावर्षी मात्र लॉकडाऊन नसल्याने महागाईने उच्चांक गाठला असून सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत त्यात मिरची देखील महाग होऊन तिला सोन्याची झळाळी आली आहे . मिरचीतले लवंगी – २०० रू . , बेडगी – २८० रू . , संख्येश्वरी – २०० रू. , घंटूर – १९० रू. , पटणी- १४० रू., काश्मिरी- ३४० रू., काश्मिरी शिमला – ३४० रू., भोम्बी- ४०० रू.,पांडी – २२० रू . , सेलम हळद – १४० रू., राजापुरी हळद- १३० रू., इंदोरी धने – १६० रू.असे एक किलोचे दर आहेत.

मात्र या दोन वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगलीच भाववाढ झाली असून या मिरचीत टाकला जाणारा मिक्स व खडा मसाला लवंग , दालचिनी , त्रिफळा , चक्रीफुल , काळीमिरी , नागकेशर , शहागिरी , खसखस , जायफळ , जायपत्री , ईलायची , तमालपत्र , दगडीफुल , जिरे , कबाबचिनी , मेथी , बडीसोब , धणे , तीळ , हिरवी वेलची , आदी गरम मसाले देखील महाग झाले आहेत.मात्र तरी सुद्धा  कर्जतच्या मिरची बाजारातून लाखो रुपयांची मिरची खरेदी केली जात आहे.

कर्जतच्या मिरची बाजारात १३ मिरची व्यापारी असून त्यांच्याकडून एक हजार टन , व लाखो रुपयांची मिरची खरेदी केली जात आहे . यावर्षी महाग मिरची झाली असतानाही फेब्रुवारी महिन्यांपासूनच खवय्यांनी मिरची खरेदी करण्यास एकच झुंबड केलेली असून आमची दुसरी पिढी स्वस्त दरात व रिटेल भावात विश्वासाने हि मिरची विकत आहोत , असे मत कर्जत रेल्वे स्टेशन बाहेर धंदा करणारे कर्जतचे प्रसिद्ध कर्जत फेमस मसाले व मिरची तसेच खडा मसाला व्यापारी अशोकशेट राठोड – मिरचीवाले यांनी मत व्यक्त केले.