Sunday, April 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडश्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे शानदार उदघाटन सोहळा संपन्न..

श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे शानदार उदघाटन सोहळा संपन्न..

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे-

श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डिकसळ -कर्जत सावंत सदन येथे शानदार उदघाटन सोहळा २८ जानेवारी २०२१ रोजी संपन्न झाला .यावेळी प्रमुख उपस्थिती रायगड जिल्हा शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील,कर्जत खालापुर विधानसभेचे आमदार महेंद्रशेठ थोरवे,मावळ तालुका युवा सेना प्रमुख व शिवभक्त प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिकेतभाऊ घुले,अनिकेतदादा तापकीरे,रमेशभाऊ पाटील, रिटा खारकर,शिवभक्त राजू मरे,स्वराज्य रक्षक संभाजी मालिका फेम प्राजक्ताताई गायकवाड,हालीवली ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रमिला बोराडे,श्रीकांत लालगुडे,नगरसेवक संकेत भासे,सुरेश बोराडे,वेणगाव सरपंच अभिषेक गायकर,दिनेश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी प्रथम श्री गणारायांच्या प्रतिमेस व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व दिप प्रज्वलन बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तर श्री सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन रायगड जिल्हा शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील ,आमदार महेंद्रशेठ थोरवे,शिवभक्त अनिकेत घुले यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आलेे.

यावेळी त्यांच्या समवेत हॉस्पिटलचे डायरेक्टर शेखर रघुनाथ बोराडे – अध्यक्ष कर्जत तालुका केमिस्ट – ड्रगिस्ट असो.व उपाध्यक्ष महाराष्ट्र जनकि मेडिसिन नसीब महासंघ ,डॉ.अझर खान,डॉ. सुनील कुमार,दिप देशमुख – डायरेक्टर,रमेश संभाजी सावंत ,सुरेश सावंत ,आदी उपस्थित होते.


खिशाला परवडतील अशा जागतिक दर्जाच्या सुविधा , कर्जतकरांच्या सेवेसाठी अत्यंत अल्प दरात १०० बेडचे हे हॉस्पिटल असून येथे मधुमेह , रक्तदाब,अपघात,हृदय किडनी यकृत आणि पोटाचे उपचार,बालरोग,स्त्री रोग निदान व शस्त्रक्रिया,अस्थमा,हाडांचे आजार व शस्त्रक्रिया,सर्व प्रकारचे वात,त्वचारोग,फिजिओथेरपी,लसीकरण केंद्र ,आय सीयु , ऑपरेशन थेटर,सुसज्ज जनरल वार्ड,मेंदू मणक्याचे उपचार , कॅन्सर,रुग्णवाहिका,डीलक्स व सेमी डीलक्स रूम ,डिजिटल एक्सरे , ईसीजी , २४ तास तज्ञ डॉक्टर , प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ , मेडिकल स्टोअर्स , इन्शुरन्स सेवा उपलब्ध आदी सेवा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतील . येथील दूरध्वनी क्रमांक ७७४४९९१६८२/ ८३ असा आहे .


याप्रसंगी झालेल्या छोटेखानी सभेत आमदार महेंद्रशेठ थोरवे म्हणाले की , कोरोनाचे संकट आले तेंव्हा राज्यातील आरोग्यसेवा जागी झाली, त्यावेळी डॉक्टर व नर्सेसनी जी भूमिका बजावली,ती वंदनीय आहे,मा.मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी आरोग्य सेवांचे डॉक्टर बरोबर घेऊन या महामारीचाा सामना केला,व राज्याला कोरोना मुक्त करण्याच्या वाटेवर आहेत.या हॉस्पिटल साठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ,गोरगरीब समाजाला अशा हॉस्पिटलची गरज आहे , तुमच्या हातून समाजसेवा घडावी ,अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.


प्राजक्ताताई गायकवाड म्हणाल्या की,डॉक्टर होऊन गोरगरिबांच्या सेवा हे खूप मोठं काम आहे,मी राणी येसूबाई यांची भूमिका करताना खूप अभ्यास केला व छत्रपतींचे नाव घेऊन शिवधनुष्य उचलून काम केले म्हणून आयुष्यात कुठलेही काम करायचे असेल तेंव्हा छत्रपतींचे नाव घ्या,स्फूर्ती येईल , महापुरुषांचे विचार डोळ्यासमोर ठेऊन येथील डॉक्टरांनी काम करावे,ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .


शिवभक्त व मावळ युवासेना प्रमुख अनिकेत घुले यांनी मार्गदर्शन केले की , छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांची मूर्ती सर्वत्र देण्याचा संकल्प शिवभक्त प्रतिष्ठाणचा असून प्रत्येक गावातील मंडळांना विधायक काम करण्यास सांगणार आहे या माध्यमातून जातीयवाद मिटवण्याचे काम करणार , गोरगरिबांचे उपचार होण्यासाठी या परिसरात हॉस्पिटल होणे गरजेचे , मात्र आजारी होऊन पेशंट वाढू नये , ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


तर हॉस्पिटलचे डायरेक्टर शेखर बोराडे म्हणाले की ,या परिसरातील नागरिक आजारी पडल्यास पनवेल ,कल्याण , मुंबई येथे जावे लागते , मात्र आत्ता इथेच माफक दरात उपचार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून हे हॉस्पिटल उभे केले आहे .तर २९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मोफत ओपीडी तपासणी होणार आहे .त्यामुळे पुढील काळात अल्प दरात अत्याधुनिक सेवा या हॉस्पिटलमध्ये मिळणार असल्याने नागरिकांच्या आरोग्याचे समाधानकारक उपचार होतील , यांत शंखाच नसेल .

- Advertisment -

You cannot copy content of this page