ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने बबन झोरे यांचा सत्कार..

0
232

खोपोली- दत्तात्रय शेडगे

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड यांच्या वतीने गोल्ड मेडल मिळवणारे बबन झोरे याचा सत्कार करण्यात आला.

खालापूर तालुक्यातील वाघेश्वर येथे राहणाऱ्या बबन झोरे याने नवी दिल्ली येथे झालेल्या (५९ वजन गटात ) पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ४ गोल्ड मेडल मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला तर या स्पर्धेतील स्ट्रॉंग मॅन पुरस्कारही आपल्या नावावर कोरला याची दखल घेत ऑल इंडिया धनगर समाज महासंघ रायगड यांच्या वतीने बबन झोरे यांच्या घरी जाऊन त्यांचा यथोचीत सत्कार केला, बबन झोरे याने देशाचे ,राज्याचे जिल्ह्याचे आणि गावाचे व समाजाचे नाव मोठे केल्याचा सार्थ अभिमान असून बबन ने अजून मोठे यश मिळवावे यासाठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे , मीडिया प्रमुख महादेव कारंडे ,रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र पुकळे, संपर्क प्रमुख आनंदराव कचरे, युवक जिल्हाध्यक्ष किशोर झोरे खालापूर तालुका अध्यक्ष ठकुराम झोरे, उपाध्यक्ष नारायण हिरवे, संघटक संतोष घाटे, महेश शिंदे, नितीन झोरे गणेश गोरे, बाबू झोरे, पप्पू झोरे सुनील घाटे आदीसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.