अदिवासी समाज यांना वाटप करण्यात येणारे अन्न धान्य गेली दोन महिने धूळ खात आहे… घोडेगाव विकास प्रकल्प..

0
198

घोडेगाव विकास प्रकल्पाद्वारे अदिवासी, कातकरी व भटका समाज मावळ यांना वाटप करण्यात येणारे अन्न धान्य गेली दोन महिने धूळ खात आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात लॉक डाऊन मुळे अदिवासी , कातकरी समाजातील बांधवांना उपासमारीची वेळ आली आहे. त्याच संदर्भात घोडेगाव विकास प्रकल्पा अंतर्गत 750 कुटुंबांना प्रत्येकी 20 किलो प्रमाणे मोफत धान्य वाटप करण्याचे आदेश शासनाने पारित केले आहेत.

त्याच अनुषंगाने गेले दोन ते अडीच महिन्यांपूर्वी हा अन्नसाठा मावळात पोहोचलेला असून घोडेगाव विकास प्रकल्प अधिकाऱ्याचे सदर अन्न अदिवासी व कातकरी समाजास वाटप करण्याबाबत दुर्लक्ष होत असल्यामुळे मावळ तहसीलदार यांनी सदर अन्न साठा आपल्या ताब्यात घेऊन स्वतःच्या मार्गदर्शनाखाली अदिवासी व कातकरी बांधवांना वाटप करावा, दोन ते अडीच महिने हा अन्न साठा वाटप करण्यात विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि ही कारवाई दोन दिवसात झाली नाही तर मावळातील अदिवासी व कातकरी बांधवांना सदरचा अन्न साठा अदिवासी भटका बहुजन संघटना यांच्या नेतृत्वाखाली गरजूंना वाटप करण्यात येईल.अशा प्रकारचे निवेदन अदिवासी भटका बहुजन संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माऊली सोनवणे यांच्या वतीने मावळ तहसीलदार यांना देण्यात आले आहे.