लोणावळा (प्रतिनिधी): पोटर चाळ या रेल्वे हद्दीत असणाऱ्या लोकसेवा रिक्षा स्टॅन्ड वरील रिक्षा चालक व मालकांना काही एजेंट शिवीगाळ करून अवैध वाहतूक करत त्रास देत असल्यामुळे ही बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बंद करण्याबाबत लोकसेवा रिक्षा स्टॅन्ड व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज रविवार दि.12 रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांना निवेदन देण्यात आले.
लोणावळ्यातील लोकसेवा रिक्षा स्टँड येथे अनेक वर्ष स्थानिक रिक्षा मालक व चालक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.नुकतेच काही वर्षांपासून याठिकाणी काही स्थानिक लोक अवैध टॅक्सी व्यवसाय करत आहेत. त्यांनी याठिकाणी काही एजंट नियुक्त केले असून त्यांच्यामार्फत सदर रेल्वे स्टेशन परिसरात अनाधिकृत बेकायदेशिर प्रवासी वाहतूक चालत आहे . त्यांच्याकडे टॅक्सी , इको , सुमो सारख्या चारचाकी गाड्या असून त्या विना परवाना आहेत.त्यातून ते बेकायदेशीर वाहतूक करत आहेत
.त्यांनी तयार केलेले एजंट हे रेल्वे प्लॅटफॉमवर जावून प्रवाश्यांबरोबर बोलणे करून सदर बेकायदेशिर वाहतूक करतात.सदर बेकायदेशीर वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवत आहेत . हा कायदेशिर गुन्हा आहे . आता तर ते रिक्षाचे ट्रिप भाडे सुध्दा इको गाडीत बसवून घेवून जातात व त्यांना आम्ही जर अडवले तर ते शिवीगाळ करतात . दारू पिऊन दमदाटी करतात व आई बहीणींवरून घाण घाण शिव्या देतात . कुणालाही आमची कंप्लेंट करा आम्ही कोणालाही घाबरत नाही अशी धमकी देतात. या एजंट कडून आम्हां सर्व रिक्षा वाल्यांना धोका आहे. रिक्षा सेवा ही अतिथी सेवा मानली जाते मग या प्रामाणिक पणे सेवा देणाऱ्या रिक्षावाल्यांना या एजेंटकडून निष्कारण त्रास होत असल्याने लोणावळा शहर पोलिसांनी न्याय मिळवून देण्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे, मावळ तालुका संपर्क प्रमुख भरत गुप्ते, शहराध्यक्ष करण भालेराव, उपाध्यक्ष वसीम खान, महासचिव अमन शेख,सचिव प्रमोद यादव, सचिव आशिष चौरे, रुपेश भाटकर, संघटक मिलिंद गुप्ते, नेताजी घोडके यांसह महिला रिक्षा चालक मालक अविशा जाधव सुर्वे यांसह लोकसेवा रिक्षा स्टॅन्डचे सर्व सभासद आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.शेख, दत्ता ठुले, अशोक जाधव, उदय निकम यांसह सर्व सभासद आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.