Monday, April 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या साथीने अखेर न्याय मिळाला !

आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या साथीने अखेर न्याय मिळाला !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )या राज्यातील शेतकरी धान्य पिकवितो , तर कामगार वर्ग दिवस – रात्र घाम गाळून मेहनत करतो , अश्या शेतकरी व कामगारांचे कदर नेहमीच करणारे कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी अखेर खालापूर तालुक्यातील टाटा कंपनीतील स्थानिक तरुण कामगारांना न्याय देऊन त्यांच्या कुटुंबांना सावरले.
खालापूर तालुक्यातील टाटा कंपनीतील ज्या कामगारांना अनेक वर्षापासून कामावरून काढून टाकले होते , आज आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रयत्नामुळे त्या कामगारांना कामावरून रुजू करून घेतले . त्याकामगारांनी कुटुंबा समवेत ” तारणहार आमदार महेंद्रशेठ थोरवे ” यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.
यावेळी कामगार सुनिल दिसले , विश्वनाथ मुंढे , संदीप मिरगळ , दत्ता मिरगळ , सागर भुईकोट , अश्पाक दुदूके , रुपेश पाटील , अनिल पाठक आदी त्यांच्या कुटुंबासोबत उपस्थित होते.सदर कार्यक्रमाच्या वेळी ” बाळासाहेबांची शिवसेना ” चे पदाधिकारी गोविंद बैलमारे , घोंगे , सदानंद घोसाळकर , बाबू तटकरे , मंगेश बांदळ , रोशन पाटील , रेशमा आंग्रे , संतोष घोसाळकर , सागर घोसाळकर , रोहित विचारे , अमर वादळ , अजय चवरे व इतर सर्व ग्रामस्थ , शिवसैनिक उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page