Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडआसल गाव ते भुतिवली गाव रस्त्याची दुरावस्था.... नागरिकांची नाराजी

आसल गाव ते भुतिवली गाव रस्त्याची दुरावस्था…. नागरिकांची नाराजी

(कर्जत : प्रतिनिधी : गुरुनाथ नमाणे ) दि. 7, कर्जत येथील आसल गाव ते भुतीवली गाव रस्त्याची पाऊस काळात मध्ये अक्षरशःदुरवस्था झाली आहे. रस्त्याची संपूर्ण चाळण झाली आहे. सर्वत्र डांबर आणि मोठीखडी गायब झालेली आहे.यावेळी रस्त्यावर पूर्ण माती येऊन बसलेली आहे.या रस्तावरून येत असताना मोठी अडचण निर्माण होत आहे.

यावेळी आसल भुतीवली रस्ता दळवलन साधन बनलेला आहे,या रस्त्यावरून कामवाले,दूधवाले इत्यादी नागरिक आणि महिला वर्ग येत असतात. रस्त्याच्या दुरावस्थेचा त्रास सोसत असलेल्या नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते की आसल गाव आणि भुतीवली गाव रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, फक्त आश्वासन देऊन कामे होत नाही,नागरीकांच्या समस्यांचे निवारण करा, अशी कळकळीची विनंती प्रशासनास करण्यात येत आहे.तरी प्रशासनाने नागरिकांच्या ह्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालावे.

- Advertisment -