Monday, March 4, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआसल ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्या रस्त्यापासून वंचित....

आसल ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्या रस्त्यापासून वंचित….

(कर्जत प्रतिनिधी:गुरुनाथ नेमाणे)

दि.25.कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचयत हद्दीतील आदिवासी वाड्या आजही 70 वर्ष होऊन गेले तरी वाड्या रस्त्यापासुन वंचित आहेत,लोकप्रतिनिधींकडून नुसते पोकळ आश्वासन देण्यात येत आहेत. आदिवासी नागरिक बोलत आहे की,येथील लोक प्रतिनिधी निवडणूक वेळी नुसते मता साठी येतात निवडुन आले कि,कोणीच येत नाही.

तुमच्या अडचणी दूर करू, रस्त्याचे नियोजन करू असे आश्वासन देतात. यावेळी कोणीही आजारी झाले तरी डोली करून पाय वाटेने घेऊन जावे लागत आहे,त्यात पाऊस पडतो आणि नदीला पूल नसल्याने नदीच्या पाण्यातून नदी ओलांडून जावं लागत आह्मी भारताचे नागरिक असून , आसल ग्रुपग्रामपंचायत मध्ये 70 वर्षपासून वस्ती आहे,भारत स्वंतत्र होऊन हि आदिवासी पिढी नी पिढी वस्ती खूप वर्ष होऊन गेले,असलं ग्रुपग्राम पंचायत मध्ये आदिवासी वाड्या राहत आहेत ,आसल ग्रामपंचायत असे बऱ्याच ठाकर वस्त्या आहेत.


इथे (१)असलवाडी (२)नाण्यांचा माळ(३)नाण्यांचा माळ धनगरवाडा(४)धमनदांड वाडी(५)बोरीची वाडी(६)भूतीवली वाडी,(७)सागाची वाडी(८)चिंचवाडी, (९)पाली धनगरवाडी, ह्या वाडीत आजही रोडची सुविधा नाही, यावेळी एकादी पुरुष/स्त्री अशी आजारी किंवा डिलिव्हरी झाली कि,रस्ता नसल्याने आमच्या लोकांचे खूप हाल होत असतात, याप्रसंगी 7 ते 8 किलो मिटर चालत जावं लागतं आणि पाऊस काळात दोन नद्या पालटून जावं लागत.

नद्यांना पूल नसल्याने लोकांचे आजही खूप हाल होतात,आदिवासी असल्याने भरपूर लोकप्रतिनिधी मतदानाच्या वेळी येऊन जातात, आश्वासन देऊन जातात, पण कोणी लक्ष देत नाही,असे किती सभापती झाले, आमदार झाले पण हे लोकप्रतिनिधी फक्त तोंडी रस्ता करून देऊ,पण शेवटी निराशा “”नाही विकास नाही अशा”‘पुरत येतात लोकांना भुलवतात,सदर आता वेळी अदिवासी वाड्यातील आजारीपणाची परिस्तिथी खूप बेताची आहे,,गोरगरीब लोक आजारी होऊन अर्ध्या रस्त्यात पण दगावली आहेत.

यावेळी प्रसासनाने व लोकप्रतिनिधींनी जरूर ह्या आदिवासी वाड्यांवर लक्ष केंद्रित करावे,तसेच सर्व महिला वर्ग जेष्ठ नागरिक आणि ठाकूर वस्ती नागरिक रस्ता कधी होईल ह्या प्रतीक्षेत असून शासनाने याचे गांभीर्य लक्षात घेता येथील रहिवासी आदिवास्यांची रस्त्याची तरतूद करावी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page