माथेरान मधील साफसफाई करताना कर्मचारी वर्गावर देखरेख करीत आहेत माथेरान नगरपालिकेचे गटनेते प्रसाद सावंत..

0
40

माथेरान दत्ता शिंदे

गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक भक्तगण दरवर्षीप्रमाणे बाप्पाच्या दर्शनासाठी गावातील दूरवर असलेल्या भागात सुद्धा बंगल्या ठिकाणी सहकुटुंब जात असतात.

पावसाळा असल्याने अनेकदा रस्त्यावर कचरा वाहून येत असतो त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना काही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी सफाई कामगारांना1सूचना देऊन गौरी गणपतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी रोड, पांडे रोड, सहदेव सावंत रोडची प्रत्यक्ष उभे राहून साफसफाई करून घेतली.

त्याचप्रमाणें रात्रीअपरात्री सुध्दा गणेशोत्सव काळात नागरिकांची रहदारी सुरू असते.त्यामुळे बहुतांश भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. नागरिकांच्या याबाबत सतत तक्रारी येत असल्याने प्रसाद सावंत यांनी मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्याशी चर्चा करून संबंधित ठेकेदार

सचिन जुकर यांना अनियमित सेवा देत असल्याबद्दल पाच हजार रुपये दंड आकारला आहे. त्यामुळे नागरी वस्तीत त्याचप्रमाणे मुख्य रस्ते पॉईंट कडे आणि दूरवर बंगल्याच्या भागातील रस्त्यावर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचेवातावरण दिसत आहे.