Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडउक्रूल जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना उतरणार प्रत्यक्षात !

उक्रूल जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना उतरणार प्रत्यक्षात !

आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्टा लगत असलेली गावे अनेक वर्षे पाणी टंचाईला येथील नागरिकांना सामोरे जावे लागत होते . मात्र तालुक्यातील हि महत्वाची समस्या लक्षात घेऊन अनेक दिवस पाठपुरावा करून , अखेर पाणी टंचाई कायम स्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी उकरूळ येथे आज जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन केले , त्यामुळे काही दिवसातच पाणी योजना प्रत्यक्षात उतरणार असल्याने या परिसरातील महिला वर्गाला दिलासा मिळणार आहे.
आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते आज भूमिपूजन झालेल्या उक्रूल जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना ३ कोटी ७२ लक्ष रुपयांची असून या योजनेसाठी अनेक दिवस त्यांनी पाठपुरावा करून ही योजना सत्यात उतरवली आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत ” बाळासाहेबांची शिवसेनेचे ” उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , विधानसभा संघटक शिवराम बदे , संपर्क प्रमुख पंकज पाटील , तालुका प्रमुख संभाजी जगताप , माजी सभापती अमर मिसाळ , नगरसेवक संकेत भासे , रत्नाकर बडेकर , माजी सरपंच सौ वंदना संतोष थोरवे , उपसरपंच विलास खडे , संदीप ठाकरे , मंगेश ठोंबरे , उपअभियंता इंगळे , जगताप , ठेकेदार अनिल पिंपरकर , पप्पू साळोखे , गणेश खडे , आदी मान्यवर व परिसरातील ग्रामस्थ , तसेच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते .
- Advertisment -

You cannot copy content of this page