![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): बस मध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची अनोळखी महिलेने फसवणूक करून 2 लाख 84 हजाराचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना दि.17 रोजी सायंकाळी 5:00 वा. च्या सुमारास वलवण एक्सप्रेस हायवे ब्रिजवर घडली. याबाबत उज्वला गौतम भोसले (वय 50, रा. पिंगळे चाळ, पिंगळे राशन दुकानासमोर, मिलिंद नगर, एफ कॅबिन, कटेमानिवली, कल्याण पूर्व ) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादे नुसार अज्ञात आरोपी महिले विरोधात लोणावळा शहर पो स्टे गुन्हा रजि. नं.207/2022 भा. द. वी. क.379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महिती नुसार फिर्यादी उज्वला भोसले या एस टी बस मधून प्रवास करत असताना बसमधील अनोळखी महिलेने बाळाला दुध पाजण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या बाजूच्या सीटवर बसून लहान बाळाच्या अंगावर कपडा टाकून त्याच्या अडोषाने सीट खाली असलेल्या फिर्यादी यांच्या बॅग मधून 2,84,000 रु. किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच सदर अज्ञात आरोपी महिला ही वलवण ब्रिजवर उतरली असल्याची तक्रार कोळसेवाडी, ठाणे,मुंबई येथून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दि.1/12/2022 रोजी वर्ग करण्यात आली आहे.
गुन्ह्यात चोरी गेलेला माल पुढील प्रमाणे 1) 3 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र कि. सुमारे 1,20,000,रु.2) 1 तोळे वजनाची सोन्याची चैन 40,000 रु. कि.3) 12 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस कि. रु.50,000,4) 1 तोळे वजनाचे सोन्याचे कानातले कि. रु.40,000, 5) 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी व वाट्या सुमारे 30,000 रु. कि., 6 ) 6 ग्रॅम वजनाचे चांदीच्या पटया व जोड़वे कि. रु.3000,असा एकूण 2,84,000 रूपये किमतीचे सोन्याचे दागीने अज्ञात महिलेने लंपास केले आहेत.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शकील शेख हे करत आहेत.