कर्जत तालुक्यात विविध ठिकाणी आमदार महेंद्रशेट थोरवे यांचा पाहणी दौरा…

0
78

माझा मतदारसंघ – माझी जनता..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
पाच दिवस संततधार पावसाने कर्जत तालुक्यात हैदोस घालून २१ जुलै च्या रात्री अतिवृष्टी होऊन अखेर सर्वत्र पूर येऊन त्याचा फटका नागरिकांना बसला.अनेकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकप्रतिनिधी तथा आमदार म्हणून माझा मतदारसंघ ,माझी जनता या नात्याने महेंद्रशेट थोरवे यांनी कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.


कर्जत तालुक्यात काही ठिकाणी जीवितहानी ,पशु – पक्षी यांचे मृत्यू , रस्ता उखडून जाणे, पूल वाहून जाणे ,शेतीचे , फळबागा ,भाजीचे मळे,घरांचे नुकसान झाले.घरात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे कपडे , फर्निचर ,अन्न-धान्य ,वाहनांचे नुकसान झाले.त्यामुळे आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी कालच प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन नागरिकांना तातडीने मदत करण्याचे सूचना केलेल्या असताना.

आज त्यांनी कर्जत तालुक्यातील कुशिवली, कोलीवली, चांदई, वदप, दहीवली त्याचप्रमाणे ईतर विविध पूरग्रस्त भागांची पाहणी दौरा त्यांनी करून नुकसान झालेल्या नागरिकांचे मनोबल वाढवून शासनाकडून जास्तीतजास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.यावेळी आमदार महेंद्रशेट थोरवे यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख भाई गायकर ,नगरसेवक संकेत भासे , तसेच इतर शासकीय अधिकारी ,शिवसेनेचे पदाधिकारी ,ग्रामस्थ उपस्थित होते.