Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत रेल्वे पुलाचे कामात दिरंगाई , पटरी ओलांडताना जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण...

कर्जत रेल्वे पुलाचे कामात दिरंगाई , पटरी ओलांडताना जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ?

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे कडील बाजूला असलेल्या ब्रिजच्या दुरुस्तीचे काम २० डिसेंबर २०२२ पासून सुरू झाले असून उद्या त्याला महिना होणार आहे . रेल्वे प्रशासनाने ठेकेदारी पद्धतीने दिलेले हे काम उद्या पूर्ण होणे गरजेचे होते . मात्र रेल्वे प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे या ब्रिजचे काम सुरुवातीपासूनच अत्यंत धिम्या गतीने सुरू होते . आजपर्यंत झालेल्या छोट्या – मोठ्या किरकोळ अपघातामुळे व या परिसरात रहाणारे गुंडगे – भिसेगाव – जुने एस टी स्टँड परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांत संताप पसरला होता. त्यामुळेच झोपलेल्या रेल्वे प्रशासनाला जागे करण्यासाठी आज दि. १९ जानेवारी २०२३ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) गटाच्या कर्जत शहर महिला अध्यक्षा सौ. वैशाली महेश भोसले यांनी कर्जत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरत , नागरिकांना व रेल्वे प्रवासी वर्गाला होणाऱ्या त्रासाबद्दल सडेतोड जाब विचारला असून काम अधिक गतीने करण्याची मागणी केली आहे.
तब्बल एक महिना हा ब्रिज रेल्वे प्रवासी व पश्चिम भागाकडे रहाणाऱ्या भिसेगाव , गुंडगे , स्टँड परिसर , व इतर नागरिकांना ये – जा करण्यास बंद झाला आहे . तर मुंबई कडे कामासाठी जाणारे प्रवासी , तसेच उल्हासनगर , अंबरनाथ , बदलापूर येथे एम आय डी सी कंपनीत जाणारे चाकरमणी , कामगार वर्ग , महिला कामगार मोठ्या प्रमाणात असल्याने घरी जाताना बाजारहाट करण्यासाठी बाजारात जाताना धोक्याची रेल्वे ट्रॅक पार करून जावे लागते , यावेळी खडीत पाय मुरगळणे , पायाला लोखंड लागणे , पाय घसरून पडल्याने होणारा अपघात त्यामुळे नागरिकांची आतापर्यंत खूप छोटे – मोठे अपघात घडले असून नागरिकांत व रेल्वे प्रवासी वर्गात रेल्वे प्रशासनाविरोधात संताप खदखदत असताना या महिनाभराच्या कामाला धिम्या गतीने सुरूवात झाल्याने ते अद्यापी पूर्ण होऊ शकले नाही.
आज आरपीआय च्या वतीने कर्जतचे स्टेशन मास्टर यांना निवेदन देण्यात आले असून हे निवेदन DRM MUMBAI यांना पाठविण्यास सांगितले . व काम चार दिवसांत संपवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल , असा ईशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे . यावेळी दिनेश दादा गायकवाड़ – कर्जत तालुका कार्याध्यक्ष , सौ.वैशाली महेश भोसले – कर्जत शहर महिला अध्यक्षा , सौ. सारिका कुंदन जाधव , कर्जत रेल्वे रिक्षा चालक – मालक संघटना स्थळ प्रमुख अरुण डोमसे ( फम भाय ) , नरेश थोरवे – उपाध्यक्ष , विठ्ठल शिलेकर , मुकेश गुप्ता , दिपक दांडेकर , आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page