Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळाकातळधार धबधबा येथे वाट चुकलेल्या दोन पर्यटकांना शिवदुर्गं मित्रने दाखविली वाट...

कातळधार धबधबा येथे वाट चुकलेल्या दोन पर्यटकांना शिवदुर्गं मित्रने दाखविली वाट…

लोणावळा (प्रतिनिधी): लोणावळ्यातील राजमाची रस्त्यावर दरीतील कातळधार धबधबा येथे वाट चुकलेल्या पर्यटकांना घनदाट जंगलातून काळोखाच्या अंधारात सुखरूप बाहेर काढत त्यांना शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी एक प्रकारे जीवनदानच दिले आहे . त्यामुळे शिवदुर्ग मित्र संस्थेच्या या मदत कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .
मिळालेल्या माहितीनुसार , शहरानजीक राजमाची लोणावळा रस्त्यावरील दरीतील कातळधार धबधब्यावर वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी पुण्यातील एक युवक व युवती ( पर्यटक ) आले होते . त्यानंतर घरी परतण्याच्यावेळी घनदाट जंगलात अंधार पडल्यामुळे ते आपली वाट चुकले होते . साधारण सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही माहिती शिवदुर्ग मित्र संस्थेला मिळताच प्रसंगावधान दाखवत क्षणाचाही विलंब न करता जवळच असलेले संस्थेचे सदस्य लहू उंबरे रेस्क्यूसाठी निघाले.
त्यापाठोपाठ संस्थेचे सर्व सदस्य देखील आवश्यक सर्व साधनसामग्रीसह कातळधार धबधब्याच्या दिशेने निघाले . त्या वाट चुकलेल्या पर्यटक युवक व युवती यांनी पाठवलेल्या लोकेशननुसार शिवदुर्गने शोध सुरु केला व अवघ्या तासाभरात त्यांचा शोध घेऊन दोघांनाही सुखरूप बाहेर काढले व कामशेत पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगिरी शिवदुर्ग मित्र संस्थेचे लहू उंबरे , अशोक उंबरे , समीर जोशी , ओंकार पडवळ , सागर कुंभार , रितेश कुडतरकर , प्रणय आंबुरे , रोहीत फुनसे यांनी केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page