Friday, March 14, 2025
Homeपुणेमावळकुंडमळा ईदोरी पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह शोधण्यात यश…

कुंडमळा ईदोरी पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांचे मृतदेह शोधण्यात यश…

मावळ : कुंडमळा ईदोरी येथील निसर्गाच्या आनंद लुटण्यासाठी आलेल्या दोन पर्यटक मुले पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली.
साजीद शरीफ बागवान वय (२०)राहणार निगडी व आतीक शरीफ बागवान वय (१५) जळगाव अशी मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी सदर तरूण हे कुंडमळा येथे पर्यटनासाठी गेले असता तेथील पाण्यात उतरले परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले MIDC पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस्.टी म्हस्के,, पोलिस हवालदार प्रशांत सोरटे यांना फोन आला की सायंकाळी ६ वाजता कुंडमळा येथे दोन मुले पाण्यात बुडाली आहेत. त्यानंतर त्यांनी सर्च रेस्क्यु टिम, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आपदा मित्र मावळ शिवदुर्ग मित्र लोणावळा यांना फोन करून त्वरित बुडालेल्या युवकांचा शोध सरू केला सायंकाळी ७:३० वाजे पर्यंत त्या मुलांना पाण्यातून बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले.
याकामी निलेश संपतराव गराडे, प्रशांत भालेराव, गणेश गायकवाड, भास्कर माळी, अविनाश कारले, सागर भेगडे, अनिश गराडे, गणेश सोंडेकर व तळेगाव दाभाडे, MIDC पोलीस स्टेशन व इंदोरी पोलीस चौकी येथील पोलिस कर्मचारी, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांना मोलाचे यश लाभले.
- Advertisment -

You cannot copy content of this page