Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा लोणावळा भाजपा कडून निषेध...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा लोणावळा भाजपा कडून निषेध…

लोणावळा दि.24: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेच्या विरोधात लोणावळा शहर भाजपा कडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. त्यावेळी लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व भाजपा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी बोलताना अरविंद कुलकर्णी म्हणाले की काही मंत्री पोलिसांना हप्ते वसुल करन्याचे टार्गेट देतात, बलात्कार करणारे राजकारणी नेते, काही आत्महत्येस प्रवृत्त करणारे नेते अजूनही मोकाट फिरत आहे यांच्यावर कारवाई केली जात नाही मात्र केंद्रीय मंत्र्याला अटक केली जात आहे हे सर्व कृत्य गंभीर असून याचा भाजपा कडून जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना म्हणाले.

त्यावेळी लोणावळा नगरीचे विद्यमान नगरसेवक देविदास कडू, शौकत शेख, हर्षल होगले, योगिता कोकरे,आणि भाजपा पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page