Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात युवासेना आक्रमक...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात युवासेना आक्रमक…

नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची केली युवासेनेची मागणी..

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी काल महाड येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले याविरोधात संपुर्ण महाराष्ट्रात शिवसेना युवासेनेचे आक्रमक पवित्रा घेत नारायण राणे यांचा पुतळा जाळत ठिकठिकाणी आंदोलन केले त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील युवासेना केलवणे जिल्हा परिषद आणि गुळसुंदे जिल्हा परिषद यांच्या वतीने नारायण राणे यांचा निषेध करीत रसायनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.


भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जन आशीर्वाद यात्रेचे आयोजण करण्यात आले आहे व ते महाड मध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, याविरोधात आज युवासेना यांच्या वतीने आंदोलन करीत रसायनी पोलिसांना राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीचे निवेदन देण्यात आले.


केंद्रीयमंत्री पदाचा दुरुपयोग करून अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य करणाऱ्या राणे यांची त्यांच्या नेत्यांनी समजूत घालावी ,जाहीर माफी मागावी, अन्यथा शिवसैनिक शिवसेना स्टाईलने उत्तर देतील, असा इशारा देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्र राज्यात शिवसैनिकांमध्ये तसेच सामान्य जन संतापाची लाट उसळली देण्यात असून आहे त्यामुळे राणे यांना अटक करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

हयावेळी शिवसेना विभागप्रमुख चंद्रकांत टकले , उप विभाग प्रमुख दीपक देशमुख , संपर्क प्रमुख अशोक थोरवे , केलवणे युवासेना जि. प अधिकारी स्वप्नील भोवड , उपविभागीय अधिकारी हेमंत कारंदे , केलवणे पंचायत समिती अधिकारी आकाश मोकळ ,उप विभाग अधिकारी रोशन खामकर , गुळसूनदे जि. प अधिकारी प्रमोद गोळे , चिटणीस आदित्य गाताडे , उपसरपंच आपटा वृषभ धुमाळ , ग्रामपंचायत सदस्य नितेश कारंदे , शाखा प्रमुख वैभव कोंडीलकर , नितीन देसाई , शिवसेना सारसई शाखाप्रमुख लक्ष्मण बावदाने , राजेंद्र घोलप ,तुकाराम गायकवाड ,भरत राऊत , युवासेना पदाधिकारी हृतिक जाधव सुशांत महाडिक ,विशाल म्हात्रे , आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page