Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखालापुरात अनधिकृत बांधकामावर हातोडा खालापूर नगरपंचायतची कारवाई..

खालापुरात अनधिकृत बांधकामावर हातोडा खालापूर नगरपंचायतची कारवाई..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या खालापूर शहरातील अनधिकृत बांधकामावर आज नगरपंचायतचे कारवाई करत
खालापूर नगरपंचायत हद्दीतील खालापूर पंचायत समित जवळ अनधिकृत बांधकाम झाल्याने अपघाताची शक्यता वाढली होती.

याबाबत खालापूर नगरपंचायती कार्यालयात अनेकदा प्रश्न उपस्थित झाल्याने अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त करीत या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता असल्याने  गंभीरपणे घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली होती.

या सर्व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी दुर्लक्ष करीत अनधिकृत बांधकाम तसेच कायम ठेवल्याने आज नगरपंचायत प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत पोलिस बंदोबस्त ठेवत मुख्याधिकारी सुरेखा भगणे व नगर अंभियता देवेंद्र मोरखडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकामावर जेसीबीच्या साहाय्याने हातोडा लावल्याने अनेक अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त झाल्याने अनेकांनी नगरपंचायतीच्या बेधडक कारावाईचे कौतुक केले.


 खालापूर नगरपंचायत हद्दीत अनेक अनधिकृत बांधकामानी मोठा थाट मांडल्याने नगरपंचायत प्रशासनापुढे मोठी समस्या उभी राहीली होती. याबाबत नगरपंचायतीच्या वतीने अनधिकृत बांधकाम करणाऱ्या सर्वाना अनधिकृत बांधकाम हटवा असे वेळोवेळी पत्र व्यवहार करुनही अनधिकृत बांधकाम करणाऱ्या या सर्व पत्र व्यवहारांकडे दुर्लक्ष करीत कानाडोळा केल्याने अखेर आज नगरपंचायत प्रशासनाने कडक भूमिका घेत अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केल्याने या कारवाई अनेक अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त झाल्याचे पाहायला मिळाले असून ही कारवाई मुख्याधिकारी सुरेखा भगणे व नगर अंभियता देवेंद्र मोरखडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


यावेळी मुख्याधिकारी सुरेखा भगणे, कार्यालय अधिक्षक त्रिंबक देशमुख, नगर अंभियता देवेंद्र मोरखडीकर, लेखाधिकारी, सुरेश पोशतांडेल, कर निरिक्षक गोविंद भिसे आदीसह नगरपंचायत कर्मचारी व पोलिस यंत्रणा उपस्थित होती.

- Advertisment -