Wednesday, May 29, 2024
Homeपुणेमावळखासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना आयोजित कार्ला येथील आरोग्य शिबिरास...

खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना आयोजित कार्ला येथील आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

कार्ला (प्रतिनिधी): खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्ला येथे आयोजित आरोग्य शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मावळ लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त एम्स हॅास्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्ला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन युवा सेना मावळ तालुकाप्रमुख विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या वतीने करण्यात आले होते.
या शिबीरात सुमारे 200 नागरिकांची विविध तपासणी करण्यात आली. यामध्ये डोळे तपासणी ,लहान मुलांच्या आजारांची तपासणी, हृदयसंबंधांतील आजारांची तपासणी,स्रीयांच्या आजारासंबंधीत तपासणी,जेष्ठ नागरिकांच्या आजारासंबंधी तपासणी करण्यात आली.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य शरदराव हुलावळे,शिवसेना जिल्हा संघटक अंकुश देशमुख,एम्स हॅास्पिटल सामाजिक विभागाचे प्रमुख डॅा.अशोक घोणे,प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी नितिन वाघमारे, मा.ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,वत्सला हुलावळे,सतिष मोरे, संतोष गिरी,सागर हुलावळे,समीर हुलावळे,अनिल हुलावळे, तुकाराम हुलावळे,भरत हुलावळे,मितीश हुलावळे,मंगेश हुलावळे,रोहिदास शिर्के,सुनिल सावळे, भारत देसाई,धनंजय मापारी,गणेश हुलावळे आदी जण उपस्थित होते.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी युवा सेना उपतालुकाप्रमुख नितिन देशमुख,करंडोली शिवसेना शाखाप्रमुख खंडू शेलार,अक्षय हुलावळे, प्रतिक देशमुख,ओंकार हुलावळे,प्रसाद शिंदे,कुणाल देशमुख,अमोल इंगवले,गौरव हुलावळे,प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page