खोपोलीतील खाजगी कंपनीत कामगारांची पिळवणूक..रासप चे बच्चू कडू यांना निवेदन…

0
67

खोपोली (दत्तात्रय शेडगे)
खोपोली ताबांटी युनिटमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रातील एका कंपनीकडून कामगारांची पिळवणूक होत असल्या प्रकरणी रासप कामगार पक्षाकडून राज्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.


खोपोली ताबांटी युनिटमध्ये अभियांत्रिकी क्उधोगातील एका कंपनीत कामगारांना किमान वेतन व इतर सोई सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी सरकारी कामगार अधिकारी यांच्या मार्फत कंपनीकडे राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा शाखेने केली होती. परंतु कंपनी मालकाने कामगारांना किमान वेतनाचे मागणीपत्र मागे घ्या, नाहीतर १ ऑक्टोबरपासून कामावरून काढून टाकण्यात येईल असे सांगितले आहे.

याविरुद्ध आता राष्ट्रीय समाज पक्ष रायगड जिल्हा शाखेमार्फत कोकण रासपचे नेते श्री. भगवान ढेबे यांनी कामगारांना न्याय द्यावा, मुजोर कंपनी व्यवस्थपनाला कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडावे, अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिले आहे. यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष संपत ढेबे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. मनीषा ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष. मुकेश भगत, आनंद ढवळे आदी उपस्थित होते.यासंदर्भात उदया दुपारी 1 वाजता कामगार आयुक्तलयात उभय पक्षी बैठक बोलावली आहे.