Sunday, April 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोली येथे दुचाकी घसरून जखमी झालेल्या त्या 30 वर्षीय अज्ञात तरुणाचा उपचारादरम्यान...

खोपोली येथे दुचाकी घसरून जखमी झालेल्या त्या 30 वर्षीय अज्ञात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू…

खोपोली (प्रतिनिधी): जुना मुंबई पुणे महामार्ग खोपोली येथील अल्टा कंपनी समोर दि.29 मार्च रोजी सायंकाळी 7:00 वा.च्या सुमारास,मोटर सायकल घसरून गंभीर जखमी झालेल्या अज्ञात इसमाचा दि.31 मार्च रोजी पहाटे 3:00 वा.उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.सदर मयत इसमाचे नाव,पत्ता वा कोणतीही ओळख अद्याप पटलेली नाही.
याबाबत खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक महेश गजानन गोरे यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली असून याप्रकरणी खोपोली शहर पोलीस स्टेशन मध्ये गु. र. नं.109/2023 भा.द.वी.सं.कलम 304(अ),279,337,338, व मो. वा. का. कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोपोली शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत इसम वय वर्षे अंदाजे 30, नाव पत्ता माहिती नाही. हा त्याच्या जवळील मोटर सायकल क्र. एम एच 46 एम 6757 ही अतिवेगाने, हयगयीने, अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत असताना खोपोली येथील अल्टा कंपनी समोर महामार्गावर घसरून अपघात झाला. या अपघातात सदर दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले.
परंतु 31 एप्रिल रोजी पहाटे 3 च्या सुमारास उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.सदर मयत इसम हा अज्ञात असून त्याची कोणतीही ओळख अद्याप पटलेली नाही. सदर इसम कोणाच्या ओळखीचा वा परिसरातील असल्यास खोपोली शहर पोलीस स्टेशन दूरध्वनी क्र.02192-263333 यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने करत आहेत.माहिती मिळाल्यास त्यांच्या मोबाईल क्र.9637140044 यावरही संपर्क करू शकता.
- Advertisment -

You cannot copy content of this page