![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): अवैध गावठी दारू भट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिस डीबी पथकाने कारवाई करत तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांचे कच्चे रसायन जेसीबी च्या साहाय्याने नष्ट करत एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल केतन महादू तळपे यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून याप्रकरणी प्राथनाबेन मेघनाथ राजपूत (वय 24, रा. वेहेरगाव कंजारभट वस्ती, ता. मावळ, जि. पुणे ) या महिला आरोपीच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 25/05/2023 रोजी सायंकाळी 5:30 वा.च्या सुमारास मौजे वेहेरगांव गांवच्या हददीत देवकरवस्ती, कंजारभट वस्ती येथील माळराणात ओढयाचे कडेला महिला प्राथनाबेन मेघनाथ राजपुत,हिने तिचे घराजवळ बेकायदा बिगरपरवाना गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे 200 लिटर मापाचे 12 प्लॅस्टीकचे ड्रममध्ये एकुण 2400 लिटर कच्चे रसायन प्रत्येकी 50 रू. लिटर प्रमाणे किं. 1,20,000/- रू. अंदाजे जवळ बाळगुन त्याची गावठी हातभट्टीची दारू काढण्याचे तयारीत असताना मिळुन आली. मिळून आलेले 2400 लिटर कच्चे रसायन जेसीबी च्या साहाय्याने नष्ट करून आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भरत भोसले,पोलीस कॉन्स्टेबल केतन तळपे,पोलीस कॉन्स्टेबल राहुल खैरे तसेच पोलीस हवालदार गाले,बोकड,पोलीस नाईक पवार, पोलीस कॉन्स्टेबल पंडीत व कमठनकर आदींनी सदर कारवाई केली असून पुढील तपास पोलीस नाईक पवार करत आहेत.