Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडडिकसळ येथे विविध शासकीय दाखल्यांच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

डिकसळ येथे विविध शासकीय दाखल्यांच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

सागरभाऊ शेळके यांचे विशेष सहकार्य..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे कर्जत तहसिल कार्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व नागरिकांना विविध दाखले मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरास या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले . या शिबिरास विद्यार्थी व नागरिकांनी तसेच महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . कडक उन्हात कर्जत या ठिकाणी जाऊन दाखले घेण्याचा त्रास वाचविल्याने सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ शेळके यांचे सर्वांनी धन्यवाद व्यक्त केले.

कर्जत तहसिल कार्यालय यांच्या माध्यमातून मौजे – वावे, उमरोली, गारपोली, डिकसळ, चिंचवली, उक्रुल, बार्डी, भानसोली, एकसळ, वडवली त. वरेडी, पाली त. वरेडी, भुतीवली मधील तसेच परिसरातील नागरिकांसाठी शासकीय दाखल्याचे शिबीर आज मंगळवार दि. ३० मे २०२३ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत प्रतीक्षा हॉल – डिकसळ येथे आयोजित केले होते . शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले , नवीन शिधापत्रिका , विभक्त शिधापत्रिका , संजय गांधी निराधार योजना , अपंग पेन्शन योजना इ. विविध दाखले भरून घेन्यात आले.
तरी या शिबिरास परिसरातील १०० हून अधिक नागरिक तसेच विद्यार्थ्यानी या शिबिराचा लाभ घेतला.सदर शिबिरास सामाजिक कार्यक़र्ते श्री सागरभाऊ शेळके याचे विशेष सहकार्य लाभले , तसेच तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार सौ. आशा म्हात्रे , मंडल अधिकारी सौ.वैशाली पाटील , अव्वल कारकुन माने , तलाठी सज़ा चिंचवली प्रवीण साळुंखे , तलाठी सज़ा माणगाव अनिल कांबळे , सेतु कार्यालय कर्ज़त बिपिन राऊत, कोतवाल सुनील गायकवाड , या सर्वांच्या सहभागामुळे हे शिबीर यशस्वी पार पडले.
- Advertisment -