लोणावळा दि.: 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कुणे गाव येथील ” डेला ऍडव्हेंचर ” येथे महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.
महिला दिनाची सुरुवात दि.8 मार्च 1908 साली न्यूयॉर्क येथे करण्यात आली असताना 1910 साली त्याची अंमलबजावणी झाली असून संपूर्ण जगभरात 8 मार्च रोजी नारी शक्तीचा सन्मान म्हणून जागतिक महिला दिन खूप उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
त्याचेच औचित्य साधून डेला ग्रुपचे सि. एम. डी. जिम्मी मिस्त्री, डायरेक्टर सिनाया प्रेसवाला, पिअरलं सानगा, सि. ओ. ओ. रेमंड इराणी, डायरेक्टर एच. आर. रोनाल्ड सरेराव, व्ही. पी. ऍडमिन आणि सेक्युरिटी सईद इरफान जाफर यांच्या विशेष प्रयत्नातून डेला ऍडव्हेंचर मधील महिला कर्मचारी व लोणावळा परिसरातील कर्तृत्वान महिलांसाठी रेम्प वॉक, संगीत खुर्ची यासारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चित्रा कामत ( क्राईम रिपोर्टर )आणि वसुंधरा मक्सरे यांना आमंत्रित करण्यात आले होते. आयोजित कार्यक्रमात डेला मधील कर्मचारी व परिसरातील अनेक महिलांनी सहभागी होऊन महिला दिनाचा आंनद साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते केक कापून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जॉनी आणि प्रणव यांनी केले.