Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमहिलांच्या सक्षमीकरणासाठी स्किल इंडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष नेहमीच पाठीशी :- सुनील...

महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्किल इंडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष नेहमीच पाठीशी :- सुनील गोगटे

भिसेगाव-कर्जत/ सुभाष सोनावणे –

महिलांचे आर्थिक धोरण सुधारण्यासाठी व त्यामाध्यमातून त्यांचे सक्षमीकरण होण्यासाठी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सरकारने ” स्किल इंडिया ” या धोरणाच्या माध्यमातूनभारतीय जनता पक्ष नेहमीच पाठीशी असेल.

असे प्रांजळ मत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शेलू येथे आयोजित केलेल्या महिलांचे कार्य व समाजातील अलौकीकता यांचे कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते , त्यावेळी भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे यांनी व्यक्त केले.


भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कर्जत मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ९ मार्च रोजी शेलू येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .


याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सौ.अश्विनीताई पाटील,जिल्हा सरचिटणीस सौ.मृणाल खेडकर,तालुका महिला मोर्चा सौ.स्नेहा गोगटे,तालुका सरचिटणीस सौ.वर्षा बोराडे,कोकण सोशल मीडिया संपर्क प्रमुख सौ.गायत्री परांजपे,तालुका उपाध्यक्ष सौ.अर्चना फोपे,उपाध्यक्ष सुनिता गुरव,तालुका कार्यकारणी सदस्य सौ.स्वप्ना सोहोनी,रसिका म्हसे,भावना ऐनकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य सौ.स्मिता मोडक, जिल्हा चिटणीस तथा माजी नगरसेविका सौ.बिनिता घुमरे,शहर अध्यक्षा सौ.सरस्वती चौधरी, उपाध्यक्ष मनिषा अथनिकर,युवा मोर्चा चिटणीस सौ.गीतांजली देशमुख,माजी तालुका अध्यक्ष सौ.सुगंधाताई भोसले,फादर बॉडी तालुका आणि कर्जतच्या नगरसेविका सौ.स्वामींनी मांजरे,फादर बॉडी चिटणीस सौ.निताताई कवाडकर,वाकसच्या उपसरपंच सौ.रजनीताई भाकीत,नेरळ शहर अध्यक्ष सौ.नम्रता कांदळगावकर,उपाध्यक्ष सौ.मानसी खेडेकर,तसेच शेलू ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि खोपोली शहरातील सौ.स्नेहल सावंत,सौ.सुनिता महर्षी,सौ.गांधीताई , पंचायत समिती सदस्य नरेश मसने , चिंचवली ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया भगत , सुविधा टिल्लू , सर्वेश गोगटे , मिलिंद खंडागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आजच्या या महिलांच्या कार्यक्रमास पुरुष वर्गानी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केले.त्याप्रसंगी तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे,तालुका सरचिटणीस राजेश भगत,संतोष भोईर, जिवन मोडक, राहुल कुलकर्णी, आणि भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व महिला तसेच शेलु पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होतेे.


यावेळी सुनील गोगटे पुढे म्हणाले की भाजप सरकार असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी खूप मोलाचे कार्य केले आहे .भविष्यात मा. मोदी सरकारच्या माध्यमातून स्किल इंडिया या धोरणाचे महत्व व फायदा कर्जत तालुका महिला मोर्चा पदाधिकारी ग्रामीण भागातील प्रत्येक घरात , सर्व महिलांच्या समोर सांगतील असा विश्वास प्रदान केला.

अल्प दरात असलेले कर्ज केंद्र सरकारच्या माध्यमातून बचत गटांना देण्यात येत आहे , पुढेही ते मिळेल , यावर प्रकाश टाकला . यावेळी या कार्यक्रमात महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला.

जे बचतगट अतिशय चांगले प्रकारे काम करतात.तसेच ज्या उद्योजिका आहेत की ज्यांनी कोविड महामारीच्या काळात चांगले काम केले असे डॉक्टर, पोलीस, शिक्षिका अशा विविध क्षेत्रातील महिला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच आजच्या प्रमुख पाहुण्या सौ.वृषाली वैद्य यांनी महिला सक्षमीकरणा बाबत मार्गदर्शन केले.तसेच भाजप सरचिटणीस राजेश भगत , किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे , भाजप महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अश्विनी ताई पाटील यांनी मार्गदर्शन केले.


यावेळी उपस्थित महिला मधून लकी ड्रॉ काढण्यात आला, विविध प्रश्न विचारणे असा एक खेळ घेण्यात आला.ज्यांनी अचूक उत्तरे दिली त्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता .

- Advertisment -