Thursday, June 1, 2023
Homeपुणेदेहूरोडदुचाकी वरून जाणाऱ्या महिलेला अडवून गळ्यातील मंगळसूत्र लंपास, देहूरोड येथील घटना..

दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेला अडवून गळ्यातील मंगळसूत्र लंपास, देहूरोड येथील घटना..

देहूरोड (प्रतिनिधी): दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला रस्त्यात अडवून चोरट्याने गाडीखाली उतरवून रोडच्या कडेला खेचत नेले व तिच्या गळ्यातले मंगळसुत्र हिसकावले . हा धक्कादायक प्रकार शुक्रवार दि .2 रोजी सकाळी 9:15 वा. च्या सुमारास देहूरोड शेलारवाडी पुलावर घडला आहे.
याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी या त्यांच्या दुचाकीवरून ऑफीसला जाण्यासाठी निघाल्या होत्या शेलारवाडी पुलाजवळ येताच चोरटा त्याची दुचाकी घेऊन फिर्यादीच्या गाडीच्या आडवा आला . फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी थांबवली असता आरोपीने फिर्यादीला गाडीच्या खाली उतरवले. तसेच त्यांना रोडच्या कडेला खेचून नेत त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्ती हिसकावून घेत तो पसार झाला . याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत .
मात्र या घटनेने केवळ पायी चालणाऱ्या महिला नाही तर आता दुचाकीवरील महिला देखील टार्गेट होत असल्याचे समोर आले आहे . महिलांच्या गळ्यातील दागिने रस्त्यावरून पळवीण्याच्या ( चैन स्नॅचींग) चे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. चैन स्नॅचिंग करणारे आता अगदी खुले आम वावरत असून केवळ रात्रीच नाही तर दिवसा ढवळ्या देखील ते सोनसाखळी चोरत आहेत.

You cannot copy content of this page