पंडित नेहरू रस्ता काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करून दया ,लोणावळा करांची मागणी..

0
243

लोणावळा : पंडित नेहरू रोडचे काम संथगतीने सुरु असल्यामुळे मुख्य बाजारातील रस्त्यावर नागरिकांना करावा लागतो वाहतूक कोंडीचा सामना.

पंडीत नेहरू रोडचे शाळा क्र.1 व ए बी सी कंपनी येथील रोडचे काम सध्या पूर्ण झालेले नाही, त्यात रस्त्याच्या मधेच चेंबर असल्यामुळे सध्या तेथून प्रवास करणे नागरिकांसाठी धोक्याचे आहे. तसेच या रोडवर सिने ब्लीस सिनेमा हॉल जवळ तर एका चेंबर मधून रस्त्याच्या मधोमध एक लोखंडी पट्टी वर निघाली असल्याने येथे मोठा अपघात होऊन एखाद्या निष्पाप जीवाला हानी होऊ शकते.

या रस्त्याचे रखडलेले काम प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करून हा पंडित नेहरू रस्ता नागरिकांना वरदळीसाठी खुला करून दिला म्हणजे सध्या लोणावळा शहरातील भाजी मार्केट ते महाराष्ट्र बँक या भागात निर्माण झालेला वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होऊ शकतो असे मत लोणावळेकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

तरी जोपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही त्या अगोदर येथील चेंबर मधून वर निघालेली लोखंडी पट्टी अपघातास कारणीभूत ठरणार नाही याची प्रशासनाने दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.