पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त,मावळातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना हॅन्ड ग्लोज व सॅनिटायझरचे वाटप.

0
85

लोणावळा प्रतिनिधी श्रावणी कामत -देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपा महिला आघाडी मावळ तालुका व पंचायत समिती मावळ यांच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत ११०० हॅन्ड ग्लोज व ६० लिटर सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आढले,येळसे, कार्ला,कामशेत ,टाकवे बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पवनानगर ग्रामीण रूग्णालयात ह्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सदर सेवा कार्यास प्रमुख उपस्थित महाराष्ट्र प्रदेश महीला मोर्चा अध्यक्ष उमाताई खापरे , माजी राज्यमंत्री संजय(बाळा)भेगडे, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश भेगडे , तालुका भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष ज्योती जाधव, प्रदेश सदस्य कोमल काळभोर सभापती निकिता घोटकुले महिला आघाडी अध्यक्ष सायली बोत्रे , जिल्हा सरचिटणीस श्रेया रहाळकर जि. प. सदस्य नितीन मराठे ,जि.प. सद्स्य अलका धानिवले , महिला आघाडी कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव सुनिल महाराज वरघडे मा. सभापती सुवर्णा कुंभार ,सरचिटणीस कल्याणी ठाकर , वैशाली ढोरे , स्मिता म्हस्के ,आनिता सावले ,सीमा आहेर, कल्याणी राक्षे, वैशाली घारे, कल्पना गराडे, रचना विधाटे, प्राची टिळे, मीनाक्षी सोरटे, सुजाता पडवळ, अंजली कडू, गणेश ठाकर, मच्छिंद्र केदारी, अमोल भेगडे, सागर शिंदे, सचिन येवले, सुनील महाराज वरघडे, सरपंच खंडू कालेकर, उपसरपंच प्रवीण घरदाळे, मंगल टेमगिरे, सुजाता टेमघिरे, सह डाॅक्टर नर्स, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.