Monday, March 27, 2023
Homeक्राईमपती पत्नीच्या भांडणात जख्मी पत्नीचा मृत्यू, पतीने मारहाण केल्याचे तपासात निष्पन्न...

पती पत्नीच्या भांडणात जख्मी पत्नीचा मृत्यू, पतीने मारहाण केल्याचे तपासात निष्पन्न…

मावळ (प्रतिनिधी) : मावळातील धक्कादायक घटना,तळेगाव दाभाडे येथे पती – पत्नीच्या भांडणात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि.27 रोजी उघडकीस आली आहे . त्यानुसार मयत विवाहितेच्या पतीवर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तुळशी पतलावत ( वय 35 , रा . तळेगाव दाभाडे ) असे मयत विवाहितेचे नाव असून आरोपी पती देवराम पतलावत ( वय 40, रा . तळेगाव दाभाडे ) याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी दुपारी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . त्यावरून घटनास्थळी केलेल्या तपासात माहिती मिळाली , की तुळशी या त्यांच्या आई व मुलांबरोबर घरी होत्या . त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना दवाखान्यात न्यायचे होते . त्यासाठी घरातील लोक बाहेर वाहतूक व्यवस्था करण्यासाठी गेले.
मात्र ते परतल्यावर त्यांना समजले की तुळशी यांचा मृत्यू झाला आहे . त्या महिलेला तळेगाव दाभाडे येथील जनरल दवाखान्यात नेण्यात आले . तिथे त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले . त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह अंतिम संस्कारसाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .
पोलिसांनी संध्याकाळी या घटनेबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा नोंद केला होता . मात्र मयत तुळशी यांच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यू आंतरिक जखमांमुळे झाल्याचे समोर आले . त्यानुसार पोलिसांनी कसून चौकशी केली असता पती – पत्नीमध्ये भांडण झाल्याचे निष्पन्न झाले . पतीने तिला मारहाण केली होती . त्यानुसार पतीवर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page