पवना नगर येथील खेळ रंगला पैठणीचा यात तनुजा कालेकर पैठणीच्या मानकरी….

0
295

पवना नगर : कै . प्रकाश गंगाराम कालेकर प्रतिष्ठाण , शिवसेना शाखा पवनानगरव श्रीमंत ओंकार गणेश मित्र मंडळ पवनानगर आयोजित भव्य शिवजयंती महोत्सव काले कॉलनी येथे संपन्न झाला.

शिवजयंती निमित्त लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, तसेच महिला भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा व लक्की ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. लक्की ड्रॉ विजेत्यांसाठी व सर्व स्पर्धाकांसाठी छत्रपती आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षाच्या कालांतराने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काले कॉलनी येथील मुख्य रस्त्याने पारंपारिक पद्धतीने वाजत-गाजत व शिवरायांचा जयजयकार करत जंगी मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीत युवक व महिला भगिनींची उपस्थित लक्षणीय होती.शिवभक्त पै. अनिकेत घुले, शिवभक्त नितीन केदारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर मराठ्यांची गौरव गाथा या महा नाट्यामधील रणरागिणी दुर्वा गायकवाड हिची दानपट्टा, तलवार बाजी व काठी लाठी ची प्रात्यक्षिके कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

आयोजित खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात प्रथम विजेत्या व पैठणी च्या मानकरी तनुजा कालेकर या ठरल्या तर, दुसरा क्रमांक पूजा गांधी, तृतीय क्रमांक मयुरी कालेकर, चतुर्थ क्रमांक पूनम कालेकर, पाचवा क्रमांक आरती कालेकर, सहावा क्रमांक सुजाता आढाव, सातवा क्रमांक घरदाळे,आठवा क्रमांक स्नेहल कालेकर, नववा क्रमांक सुजाता टेमघरे तर रेश्मा कालेकर यांनी दहाव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कै. प्रकाश गं. कालेकर प्रप्तिष्ठाण, पवना नगर शिव सेना कार्यकर्ते आणि श्रीमंत ओंकार मित्र मंडळ पवना नगर चे सर्व पदाधिकारी समवेत ग्रामस्थ,व महीला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.