Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड"भाई गायकर यांच्यामुळेच माझी राजकीय कारकीर्द घडली "- आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे...

“भाई गायकर यांच्यामुळेच माझी राजकीय कारकीर्द घडली “- आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचे गौरवोद्गार..

शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )पंचवीस वर्षांपूर्वी मी शिवसेनेत दाखल झाल्यावर मला उपतालुका प्रमुख पदी नेमणूक करून माझी राजकीय कारकीर्द त्यावेळेचे शिवसेनेचे कर्जत तालुका प्रमुख भाई गायकर यांनीच घडविली , व सातत्याने मार्गदर्शन व पक्षाचे आदेश पाळत इथवर मजल मारली , असे गौरवोद्गार कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी वेणगाव येथे ” बाळासाहेबांची शिवसेनेचे ” उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात काढले.
यावेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते गजुभाई वाघेश्वर , संपर्कप्रमुख पंकज पाटील , संघटक संतोषशेठ भोईर , उपसभापती मनोहर दादा थोरवे , माजी नगरसेवक कृष्णा घाडगे , सनी चव्हाण , भाजपचे दिपक बेहरे , रमेश मुंडे , ता.प्रमुख संभाजी जगताप , नगरसेवक संकेत भासे , शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , संघटक नदीमभाई खान , माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिषेक गायकर , उद्योजक गणेश मुंढे , वेणगाव ग्रामपंचायत सरपंच – उपसरपंच – सर्व सदस्य त्याचप्रमाणे अनेक शिवसेनेचे पदाधिकारी , शिवसैनिक व मोठया प्रमाणात त्यांचे कुटुंबातील सदस्य मित्र – आप्तेष्ट – नातेवाईक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे म्हणाले कि , भाई गायकर हे नेहमीच सर्वांच्या कठीण प्रसंगात धावून जाणारे नेतृत्व आहे . राज्यात सत्ताबदलाच्या घडामोडी होत असताना यावेळी देखील मोठ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले , असे भावनिक मत व्यक्त करून त्यांनी भाईंना वाढदिवसानिमित्त मनोभावे शुभेच्छा व्यक्त केल्या.तर संघटक संतोषशेठ भोईर यांनी देखील भाईंच्या नावातच भाऊ व आईची माया आहे.
नेहमीच सर्वांना मदतीचा हात देणारे भाई तालुक्यातील वेणगाव ची शान आहे , असे मत व्यक्त केले.कर्जत तालुक्यातील ” रिक्षा चालक ते दानशूर व्यक्तिमत्व ” हा त्यांचा प्रवास खरोखरच संघर्षमय व तालुक्याच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिण्या सारखाच आहे . नेहमीच सफेद पोशाखात दिमाखदार वावरणारे भाईंचे चारित्र्य देखील स्वच्छ व निखळ आहे . यावेळी ” गोर गरिबांचे तारणहार ” भाई गायकर यांना राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page