भाजप कामगार आघाडीच्या वतीने पोलिसांचा सन्मान..

0
30


सफाई कामगरांना खाऊ वाटप करून वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न..

खोपोली- दत्तात्रय शेडगे
भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून , आमदार रवीशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पेण यांच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहेत.
कोरोना काळात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला आहे.पेण नगरपालिकेचे सफाई कामगार यांना खाऊ वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच लॉकडाउन काळात पोलिस प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे वडखळ पोलीस स्टेशन, पेण पोलीस स्टेशन व डी वाय एस पी कार्यालय पेण यांचं गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला आहे.
मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम करीत असल्याचे कोकण विभागीय कामगार आघाडीचे अध्यक्ष विनोद शहा यांनी सांगितले. तसेच ग्रामपंचायत शेडाशी येथे नागरिकांना मास्क वाटप करून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी कोकण विभाग कामगार आघाडी अध्यक्ष विनोद शहा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद वेदक तसेच शेडाशी सरपंच तथा कामगार आघाडी पेण तालुका अध्यक्ष प्रकाश कदम, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी , महेश भिकावले व कार्यकर्ते उपस्थित होते.