Monday, March 4, 2024
Homeमहाराष्ट्रभीमा कोरेगाव येथे जय स्तंभ अभिवादनासाठी भीम अनुयायांची तुफान गर्दी…

भीमा कोरेगाव येथे जय स्तंभ अभिवादनासाठी भीम अनुयायांची तुफान गर्दी…

भीमा कोरेगाव : पेरणे येथे जयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात सुरु झाला.यावेळी भीम अनुयायांनी अभिवादनासाठी रात्री पासूनच गर्दी केलेली होती . मिळेल त्या वाहनाने भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथे दाखल होत होते.
या शोर्य दिनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी वाहनतळावर आलेल्या अनुयायांशी संवाद साधला व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
पोलीस प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे अभिवादन सोहळा शिस्तीत पार पडला. पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोहळा शांततेत पार पडावा यासाठी नियंत्रण कक्षाद्वारे सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेऊन होते.तसेच जिल्हा परिषदेने पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची चांगली सुविधा केली असून आरोग्य पथकाद्वारे गरजूंना सेवा देण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी परिसराला भेट देऊन स्वतः या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनीही भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.तर पीएमपीएमएल प्रशासनाने देखील लोणीकंद आणि कोरेगाव भीमा अशा दोन्ही बाजूने सेवा सुरु ठेवून उत्तम सहकार्य केले.तर या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्यावतीने वादळ वारा हा भीम गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला.व भीम शाहीर मेघानंद जाधव यांनी भीम गीते सादर केली.
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजनाची जबाबदारी राज्य शासनाने समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी तयारी केली. गृह विभागाने विविध सूचना जारी केल्यानुसार कार्यक्रम सुरु होता.
- Advertisment -

You cannot copy content of this page