Saturday, July 27, 2024
Homeपुणेलोणावळादेवीक भवर आणि लक्ष भवर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, नागरिकांसह पोलिसांकडूनही कौतुक…

देवीक भवर आणि लक्ष भवर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, नागरिकांसह पोलिसांकडूनही कौतुक…

लोणावळा (प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यात वाकसई मावळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे कुमार देवीक भवर आणि कुमार लक्ष भवर यांनी योगासन स्पर्धेत केलेल्या प्रशंसनीय कामगिरी बद्दल या दोन्ही भावंडांना लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून शुभेच्छा भेट देण्यात आली.
देवीक महादेव भवर आणि लक्ष महादेव भवर यांनी योगासन स्पर्धेत नावलौकिक केल्याबद्दल लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे भूषण कदम, विनोद गवळी, सागर कुंभार, आनंद शिर्के व अनिकेत इंगवले यांनी काल भवर कुटुंबियांच्या घरी जाऊन या दोन्ही खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
त्यामुळे या दोन्ही बंधुचा उत्साह तर वाढलाच परंतु त्यांना पुढील कार्यास प्रोत्साहन ही मिळेल अशी अपेक्षा यावेळी पोलीस मित्रांकडून व्यक्त करण्यात आली. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या शुभेच्छाबद्दल भवर कुटुंबियांकडून त्यांचे आभार मनन्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page