
मावळ (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुक्यातील रिक्त पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या चाचपणी मुलाखती बुधवार दि.9 रोजी लोणावळा,कामशेत,वडगाव, तळेगाव,देहूरोड या ठिकाणी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी व स्थानिय जनाधिकार समिती, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हेमंत संभूस, सरचिटणीस, विधी व जनहित कक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. किशोर शिंदे,महाराष्ट्र प्रदेश मनसे उपाध्यक्ष ॲड. गणेशआप्पा सातपुते, शहर अध्यक्ष, गटनेते पिंपरी-चिंचवड सचिन चिखले यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या.
मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली शहरी विभागातील शहराध्यक्ष व ग्रामीण विभागातील तालुका उपाध्यक्ष,तालुका संघटक या पदांसाठी तब्बल 50 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून मुलाखती दिल्या.
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मावळ तालुका कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती.यानंतर मावळ तालुका कोर कमिटीच्या वतीने सर्व भागांमध्ये कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकी घेण्यात आल्या व तसा अहवाल तयार करून तालुका कार्यकारिणीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते.काल याच अनुषंगाने तालुका कोर कमिटीच्या माध्यमातून चाचपणी व मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मनसे नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते येत्या काही दिवसांत निवडीचे पत्र देऊन तालुका कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात येणार असल्यामुळे इच्छुकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण या मुलाखतीदरम्यान पाहायला मिळाले.
यावेळी सचिन भांडवलकर,तानाजी तोडकर,सुरेश जाधव,संजय शिंदे आदि जण उपस्थित होते.