Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळामहामार्ग वाहतूक पोलीस खंडाळा चौकी येथील श्री दत्त मंदिरात जयंती उत्सव साजरा…

महामार्ग वाहतूक पोलीस खंडाळा चौकी येथील श्री दत्त मंदिरात जयंती उत्सव साजरा…

खंडाळा(प्रतिनिधी):खंडाळा महामार्ग पोलीस चौकीत सालाबादप्रमाणे श्री दत्त जयंती चा कार्यक्रम उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा वाघजाई देवी मंदिर हद्दीत महामार्ग वाहतूक पोलीस चौकी येथे वाहतूक पोलीसांकडून श्री दत्त जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात लोणावळा खंडाळा परिसरातील विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास भेट देऊन श्री दत्त गुरुंचे दर्शन घेतले.
तर पूजेसाठी येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना महामार्ग वाहतूक टॅब चे अधिकारी महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी परिसरातील अनेक भाविकांनी श्री दत्त गुरूंचे दर्शन घेत महाप्रसाद आणि भंडाऱ्याचा आस्वाद घेतला.
- Advertisment -

You cannot copy content of this page