माथेरान मध्ये गौराईचे मोठ्या उत्साहात आगमन…

0
86

मात्र कोरोनाच्या संकटाने महिलांचे एकोप्याने दर्शन दुरावले.

दत्ता शिंदे …माथेरान

माथेरान शहरात गणराया सह गौराईचे पारंपरिक पद्धतीने आगमन झाले असून घरो घरी गौराई बसविण्याची धामधूम चालू होती.सर्वत्र मोठ्या भक्ती भावाने एकी मेकींच्या घरो घरी जाऊन गौराईच्या लक्ष्मी घेण्यासाठी तसेच हळदी कुंकवाचे वाण घेण्या साठी पारंपरिक रिवाजा प्रमाणे चाललेली प्रथा आहे.परंतु ह्या वर्षी प्रत्येक सणावर कोरोनाचे सावट असल्याने कोणी कोणाच्या घरी जाण्यास धजावत नाही.

त्याला ह्या वर्षाचा गौरी गणपतीचा सण ही अपवाद नाही. तसेच शहरात कुठेही डीजे किंवा लाऊडस्पीकर चा आवाज नसल्याने प्रत्येक सणांच्या आनंदावर विर्जन पडले आहे.दर वर्षी गौराई पूजनाला नवागत सुनांचे व महिला वर्गाचे नटून थटून सोन्याचे दाग दागिने अंगावर परिधान करून सौभाग्याचे लेण घेण्यासाठी साठी घरो घरी जात असत दूर वरून आलेल्या पाहुण्यांची लगबग असायची नाते मंडळींची उठ बस असायची परंतु कोरोनाचे सर्वांवरच अंकुश ठेवलं आहे.

गौराईच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी महिलांचे थवेच्या थवे गौराई ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गौरीपूजना साठी जायच्या तेही कार्यक्रम ह्या वर्षी उंबरठ्या च्या आता होयाला लागल्याने बाळगोपलासह वयोवृद्ध मंडळीच्या चेहऱ्यावरची भक्ती भावाची जी तेजस्वी रूप लपत होते.ह्या दहा दिवसांच्या कालावधीत शहराच्या काण्याकोपर्या सह गल्लीबोलात अभांगाचा नाद घुमायचा तर महिला वर्ग फुगड्या मध्ये दंग असायच्या आता फक्त प्रत्येकाच्या घरातच हा कार्यक्रम होत असल्याचे दिसून येत आहे.


माथेरानच्या बऱयाच ठिकाणी गौराईचे आगमन होत असते.त्यात प्रामुख्याने हिरावती सकपाळ यांच्या घरी गौराई पूजनाचा कार्यक्रम होत असतो परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ठराविक महिलांनी सोशलडिस्टन चे भान ठेवून पारंपारिक पद्धतीने पूजनाचा कार्यक्रम केला.


माथेरानच्या संतरोहिदास नगर येथील गौराईचे रूप खूपच सुन्दर असते .घरो घरी गौरी गणपती चे आगमन असते तर काहींच्या घरी फक्त गौराई ची स्थापना केली असते.गौराईचेअगदी मनोभावे मोठ्या भक्ती भावाने त्यांना सजविले असते तर दाग दागिन्यांनी परिधान करून मनमोहक रूप देखण्या जोग असते.ह्या वर्षी सर्वत्र कोरोना सारख्या महामारीच्या भीतीच्या सावटा खाली असलो तरी घरो घरी गणपती सह गौराईचे पूजा आर्चा मोठ्या उत्साहात होताना दिसून येत आहे.