Friday, June 14, 2024
Homeपुणेमावळमावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, मावळच्या युवकांची खंडाळा तालुक्यात योग स्पर्धेत...

मावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, मावळच्या युवकांची खंडाळा तालुक्यात योग स्पर्धेत उत्तुंग भरारी…

मावळ (प्रतिनिधी): सातारा जिल्हा क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून आयोजित खंडाळा तालुका योग स्पर्धेमध्ये मावळातील लक्ष महादेव भवर आणि देविक महादेव भवर या दोन सख्या भावंडांनी प्रथम क्रमांक पटकावीत मावळ च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
मावळ तालुक्यातील संत तुकाराम नगर वाकसई चाळ येथील रहिवाशी असून समता माध्यमिक व कनिष्ठ आश्रम शाळा पडेगाव येथे शिक्षण घेत असलेल्या दोन सख्या भावांनी या योग स्पर्धेत प्रथम क्रमांकावर बाजी मारत मावळ चे नाव लौकिक केले असल्याने मावळातून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सातारा जिल्हा क्रीडा विभाग यांच्या माध्यमातून खंडाळा तालुका योग स्पर्धेचे आयोजन राजेंद्र विद्यालय खंडाळा भाग शाळा बावडा याठिकाणी दि. 26/11/2022 रोजी तालुका स्तरीय योग क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समता माध्यमिक व कनिष्ठ आश्रम शाळा पाडेगाव यांच्या माध्यमातून योग स्पर्धेमध्ये 17 व 19 वयोगटामध्ये मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह पाडेगाव शाखा नं 2 मधिल विध्यार्थी तसेच मावळचे भूमिपुत्र असलेले लक्ष महादेव भवर आणि देविक महादेव भवर यांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कौतुकास्पद कार्यामुळे मांगल्य शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page