Tuesday, April 16, 2024
Homeपुणेकामशेतमावळातील शिवणे येथील अल्पवयीन विध्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणी 20 वर्षीय युवकास अटक...

मावळातील शिवणे येथील अल्पवयीन विध्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणी 20 वर्षीय युवकास अटक…

मावळ (प्रतिनिधी): मावळातील शिवणे येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी 20 वर्षीय युवकाला अटक केल्याची घटना मंगळवार दि.17 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास डोणे-शिवणे खिंडीत घडली.
याप्रकरणी प्रशांत बबन घारे (वय 20, रा. कामशेत ता , मावळ जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीला वडगाव मावळ पोलिसांनी मंगळवार दि.24 रोजी अटक केली आहे.
वडगांव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील शिवणे गावच्या हद्दीतील डोणे – शिवणे खिंडीत अल्पवयीन विद्यार्थिनीचा आरोपी प्रशांत घारे याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. पिडीत विद्यार्थिनी ही कॉलेजला जात असताना तिचा पाठलाग करत आरोपीने डोणे-शिवणे खिंडीत पीडित मुलीचा उजवा हात पकडुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तीचा विनयभंग केला पुढील तपास वडगांव मावळ पोलीस करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page