Thursday, June 13, 2024
Homeपुणेमावळमावळात ग्रामपंचायत निवडणुकीत नऊ पैकी सहा जागांवर राष्ट्रवादी तर तीन जागांवर भाजप…

मावळात ग्रामपंचायत निवडणुकीत नऊ पैकी सहा जागांवर राष्ट्रवादी तर तीन जागांवर भाजप…

मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे निकाल जाहिर झाले आहेत. या नऊपैकी 6 जागांवर राष्ट्रवादी तर 3 जागांवर भाजपचे सरपंच विराजमान झाले आहेत. मावळ तालुका हा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला झाला असून आजचा निकाल देखील राष्ट्रवादीच्या बाजूने असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे.

ग्रामपंचायत व सरपंच पदी विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे आहेत…..

1) कुणेनामा ग्रामपंचायत – सुरेखा संदीप उंबरे (506 मते)
2) वरसोली ग्रामपंचायत – संजय बबन खांडेभरड (709 मते)
3) देवले ग्रामपंचायत – वंदना बाळू आंबेकर (582 मते)
4) इंदोरी ग्रामपंचायत- शशिकांत राजाराम शिंदे (1775 मते)
5) निगडे ग्रामपंचायत – भिकाजी मुक्याजी भागवत (654 मते)
6) सावळा ग्रामपंचायत – मंगल नागू ढोंगे (454 मते)
7) गोडूंब्रे ग्रामपंचायत निशा गणेश सावंत (376 मते )
8) भोयरे ग्रामपंचायत – वर्षा अमोल भोईरकर
9) शिरगाव ग्रामपंचायत – प्रविण साहेबराव गोपाळे (बिनविरोध).
- Advertisment -

You cannot copy content of this page