Tuesday, May 30, 2023
Homeपुणेमावळमावळ तालुका स्काऊट गईड संघनायक प्रशिक्षण शिबीर संपन्न…

मावळ तालुका स्काऊट गईड संघनायक प्रशिक्षण शिबीर संपन्न…

मावळ (प्रतिनिधी) : पुणे भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय स्काऊट गाईड संघनायक प्रशिक्षण शिबीर जि. प. केंद्रिय शाळा कान्हे, ता. मावळ येथे गटशिक्षणाधिकारी तथा सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) मा. श्री. सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा संघटन आयुक्त (स्काऊट) दिगंबर करंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती शोभा वहिले, मुख्याध्यापक राम कदमबांडे, केंद्रप्रमुख अजित नवले व पांडुरंग ढेंगळे, पंचायत समिती विषयतज्ञ श्रीमती बिल्किसबानो अन्सारी, श्रीमती आरती कुंडले व श्रीमती साधना काळे उपस्थित होते.
शिबीर प्रमुख म्हणुन जेष्ठ ट्रेनिंग कौंन विजयकुमार जोरी यांनी काम पाहिले तर शिबिर सहाय्यक म्हणून श्री. अनिल कळसकर, श्रीमती सुजाता तारळकर, श्रीमती रत्नप्रभा गायकवाड उपस्थित होते. जिल्हा कार्यालयातर्फे श्रीमती रुपाली वाजे, विविध शाळांतील स्काऊटर, गाईडर शिक्षक तसेच स्काऊट गाईड विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जोरी सरांनी उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अन्सारी मेडम यांनी धन्यवाद दिले.

You cannot copy content of this page